
Former Prime Minister of India Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान प्रख्यात अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. २८) दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधी करण्यात आला. यावेळी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुरमू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
डॉ. मनमोहनसिंह यांची कन्या शुक्रवारी (ता.२७) रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचली. यानंतर डॉ. मनमोहनसिंह पार्थिव शनिवारी काँग्रेस मुख्यालयात आणले. यानंतर डॉ. सिंह यांच्या पार्थिवाची निगमबोध घाटाकडे अंत्यसंस्कार यात्रा निघाली.
संसदेतील अभ्यासपूर्ण भाषण
डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाने संपूर्ण जगभरात शोक व्यक्त करण्यात आला. "अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले डॉ. मनमोहनसिंह एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. देशाच्या अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर काम केले. देशाच्या आर्थिक धोरणांवर त्यांची अमीट छाप होती. संसदेत त्यांनी केलेली भाषणं अभ्यासपूर्ण होती. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनीही डॉ. मनमोहनसिंह यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे की, "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसेच देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंह यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरुजी त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो."
स्मारकासाठी जागा मिळणार
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांचे स्मारक बांधले जाणार आहे, केंद्र सरकारने यासाठी होकार दिला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि डॉ. मनमोहनसिंह यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे. यापूर्वी स्मारकाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे बोलले जात होते, त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता सरकार तयार झाल्याने हा वाद संपला असल्याचे बोलले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.