
Pune News : गेल्या महिन्यात मदर डेअरीने आपल्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रति लिटर २ रुपयांची वाढ करताना शेतकरी हितासाठी दुधाच्या किमतीत वाढ केल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता मदर डेअरीने चालू आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल १३ टक्कांनी वाढवून १७ हजार कोटी रुपये करण्याचे लक्ष्य ठेवल्याचा दावा मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश यांनी केला आहे. कंपनीला दुग्ध आणि खाद्यतेल उत्पादनांना चांगली मागणी अपेक्षित असल्याचेही बंदलिश यांनी म्हटले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, मदर डेअरी दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख दूध पुरवठादार असून देशभर ‘धारा’ ब्रँड अंतर्गत खाद्यतेलाची विक्री करते. दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे ४०० ‘सफल’ किरकोळ विक्री केन्द्रांद्वारे ताजी फळे आणि भाज्यांची विक्री करते अशीही माहिती बंदलिश यांनी दिली. तसेच कंपनीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, गेल्या आर्थिक वर्षात १५ हजार कोटींचे लक्ष गाठल्याचे देखील बंदलिश म्हणाले. तसेच बंदलिश म्हणाले की, कंपनी सतत आपल्या ध्येयाकडे वाढ करत असून मागील तीन वर्षात ४० टक्क्यांहून अधिक महसूल वाढला आहे.
तर “जस जसे या चालू आर्थिक वर्षात आमची वाटचाल होत आहे. आमच्या लक्ष वाढीचा वेग वाढवण्याचा आम्हाला विश्वास असून आमच्या लक्षात आणखी १५०० ते २००० कोटींची भर पडण्याची शक्यता असल्याचेही बंदलिश म्हणाले. तसेच पुढे बंदलिश म्हणाले की, २०२४-२५ या आर्थिक वर्षाची सुरुवात खूप उत्साहवर्धक झाली आहे. या कालावधीत दही, आइस्क्रीम आणि दुग्धजन्य पेये यासारख्या उन्हाळी हंगामातील उत्पादनांच्या विक्रीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
बंदलिश म्हणाले, मध्ये आत्तापर्यंत मदर डेअरीने सुमारे ३० उत्पादने सादर केली आहेत. तर या वर्षी, आम्ही आमची राष्ट्रीय स्तरावर आमचे नाव मजबूत करण्यासह, वितरण आणि क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.