Mother Dairy Milk : अमूल पाठोपाठ मदर डेअरीने केली दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ

Mother Dairy Milk Price Hike : अमूल पाठोपाठ मदर डेअरीने देखील सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली. ही दर वाढ सोमवारीच (ता.३ ) लागू करण्यात आली.
Mother Dairy Milk
Mother Dairy MilkAgrowon

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशातील नागरीकांच्या पदरात महागाईच पडताना दिसत आहे. सोमवारी (ता.३) अमूलने आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात वाढ केली होती. त्यापाठोपाठ आता मदर डेअरीने देखील दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ सोमवारीच (ता.३) लागू करण्यात आली असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागलेली आहे.

सोमवारी (ता.३) अमूलने पिशवीबंद दुधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर वाढ केली होती. यामुळे इतर दूध संघ दुधाच्या दरात वाढ करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यादरम्यान सोमवरीच मदर डेअरीने एक लिटर आणि अर्धा लिटरच्या पिशवीबंद दुधाच्या किंमतीत वाढ केली. त्यामुळे ग्राहकांना आता एका लिटर मागे २ रूपये आणि अर्धा लिटरसाठी १ रूपये अधिक मोजावे लागणार आहेत.

Mother Dairy Milk
Amul Milk : लोकसभा निकालाआधीच 'अमूल'ने दिला झटका; केली २ रुपयांनी वाढ

मदर डेअरीने वाढवलेल्या किंमतीनुसार नवे दर :

बल्क वेंडेड दूध ५२ वरून ५४ रूपये; टोन्ड दूध ५४ वरून ५६; गायीचे दूध ५६ वरून ५८ रुपये; म्हशीचे वरून ७२ रूपये; फुल क्रीम दूध ६६ वरून ६८ रुपये; डबल टोन्ड दूध ४८ वरून ५० रूपये झाले आहे.

नेमकं कारण?

सोमवारी दुधाचे दर वाढवताना अमूलने कारण सांगितले होते. मात्र येथे मदर डेअरीने गेल्या काही महिन्यांत आम्ही जादा दर देऊन दूध खरेदी करत आहोत. यामुळेच दुधाचे दर वाढवल्याचे डेअरीचे म्हणणे आहे.

दुग्ध व्यापाऱ्यांचे म्हणणे काय?

दुधाचे दर वाढण्याचं कारण वाढलेली उष्णता असल्याचे दुग्ध व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावरांनी दूध देण्याचे बंद केलं किंवा ते कमी केल्याचे कारण देखील दुग्ध व्यापाऱ्यांनी दिलं आहे. यामुळेच दूध कंपन्यांनी दुधाचे दर वाढवल्याचे बोलले जात आहे.

Mother Dairy Milk
Milk Price Hike: चारा टंचाईमुळे दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ

अमूलचे म्हणणे काय?

याआधी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या अमूलने दुधाच्या दरात वाढ करताना म्हटले आहे की, "कामकाजाचा खर्च आणि दुधाच्या उत्पादनाचा खर्च यात वाढ झाल्याने दर वाढ करण्यात आली. तर त्यांच्या इतर सदस्य संघटनांनी शेतकरी हितासाठी गेल्या वर्ष भरात दुधाच्या किमतीत सुमारे ६-८ टक्क्यांनी वाढ केली

दरम्यान राज्यात पडलेल्या दुष्काळ आणि चारा-पाणी टंचाईच्या झळा दूध उत्पादकांना बसत आहे. त्यातच खासगी दूध संघानी १ रूपये दुधाच्या दरात कपात करून दूध उत्पादकांना झटका दिला होता. यानंतर आता अमूलच्या पाठोपाठ मदर डेअरीने देखील दर वाढ केल्याने त्याचा परिणाम राज्यात होऊ शकतो. येथे देखील दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com