Mango Season : तळोदा, अक्कलकुवा, शहाद्यात आंबा पिकाने धरला बहर

Mango Blossom : खानदेशात सातपुडा पर्वत व लगतच्या तळोदा, अक्कलकुवा, शहादा तालुक्यात आंब्याने मोहोर धरला आहे. आंबा बहरला आहे.
Mango Farming
Mango Farming Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वत व लगतच्या तळोदा, अक्कलकुवा, शहादा तालुक्यात आंब्याने मोहोर धरला आहे. आंबा बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आंब्यांची मोठमोठी झाडे असून, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

जळगावात रावेर, यावल, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा आदी भागांत आंबा उत्पादन घेतले जाते. नंदुरबारातील धडगाव, अक्कलकुवामधील पर्वतीय क्षेत्रात आंबा पीक अधिक आहे. शहादा तालुक्यातील वडाळी व लगत काही भागातील शिवारात आंब्याच्या झाडांना आम्रमोहोर फुटला आहे.

Mango Farming
Mango Crop Management : भरपूर फळांच्या उत्पादनासाठी आंबा बागेचं नियोजन

यंदा कमी अधिक मोहर आहे. आम्रवृक्ष मोहोराने बहरल्याचे अनेक भागांत दिसत आहे. गेल्या वर्षी अत्यल्प प्रमाणात आम्रवृक्ष बहरला होता. यामुळे आंबा उत्पादनात घट शेतकऱ्यांना जाणवली होती. यंदा मात्र स्थिती बरी आहे.

रब्बी हंगामही जोमात

खानदेशात मागील वेळेस पाऊसमान कमी होते. यामुळे रब्बी जेमतेम होता. पण यंदा रब्बीची पेरणीअपेक्षेपाक्षा अधिक आहे. यातच डिसेंबर महिन्यात गारपीट व पाऊस झाला. यामुळे रब्बीचे काही भागात नुकसान झाले तर काही भागात पाण्याचे स्रोत बळकट झाले. गिरणा, अनेर, पांझरा, तापी नदीकाठी पाण्याची मुबलकता आहे.

Mango Farming
Mango Production : आमराईत फळधारणा वाढविण्याचे सोपे उपाय

परंतु काही भागात पाणी कमी आहे. यामुळे रब्बी हंगाम बरा आहे. ज्यावर्षी गव्हासह रब्बी हंगाम चांगला येतो, त्या वर्षी आंब्यांचा हंगाम चांगला उत्पादनाने आकारतो असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

आंब्याला चांगला मोहराचा बहर आल्यास आंबा उत्पादकांना चांगले उत्पादन मिळेल. रावेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, शिरपूर, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, शहादा तालुक्यात आंब्यांना आम्रमोहोर फुटून फळे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com