Team Agrowon
बदलत्या वातावरणानुसार आंबा बागेमध्ये परागीभवन न होणं, फळधारणा न होणं तसचं फळगळ आणि फळांवर डाग पडणं अशा समस्या दिसून येतात. त्यामुळे आंबा फळे टिकवण्यासाठी, वाढविण्यासाठी आणि त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे.
आंबा मोहरातील परागीभवन वाढविण्यासाठी मोहरावरून हात फिरविणे, उंच फांदीवरील मोहोरासाठी बांबूच्या काठीला केरसुणी बांधून फिरवावी.
आंबा बागेत कीटकांना आकर्षित करण्यासाठी सुका मासा पाण्यात भिजवून लटकवावा. यासाठी निकृष्ट दर्जाच्या बांगडा माशाची निवड करावी. यामुळे परागीभवन करणारे कीटक विशेष करून माश्या आकर्षित होऊन आंब्यामध्ये परागीभवन होताना आढळते.
फळधारणेनंतर एकाच दांडीवर भरपूर फळे धरली असल्यास उत्तम वाढ होणारी एक ते दोन फळे ठेवून उरलेली फळे काढून टाकावी.
वाऱ्याचा वेग अधिक असल्यास फळधारणा न झालेली व सुकलेली फुले गळून पडतात. अशावेळी वारा नसल्यास बांबूच्या काठीला लोखंडी हूक बांधून फांदी हलवून सुका मोहर पाडणे, मेलेल्या फांद्या व बांडगूळ काढून टाकणे गरजेचे आहे.
फळवाढीच्या अवस्थेत फळे एकमेकाला घासून फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळते.अशावेळी दोन मोठ्या फळांमध्ये सुके पान अडकवणे गरजेचं असतं.
डागविरहित फळे मिळण्यासाठी २० × २५ सेंटिमीटर आकाराच्या वर्तमानपत्राच्या पिशव्या तयार करून गोटीच्या आकाराची फळे गळून गेल्यानंतर उरलेल्या फळांना त्यांचे वेष्टण घातल्यास आत सूक्ष्मवातावरण निर्माण होऊन फळांच्या दर्जात सुधारणा होते.
Tractor Sellection : शेतीकामासाठी कोणता ट्रॅक्टर बेस्ट?