Sitaphal Cultivation : नियोजन सीताफळ लागवडीचे
डॉ. प्रदीपकुमार उलेमाले, डॉ. सचिन डिग्रसे
Sitaphal Cultivation Update : खडकाळ, रेताड जमिनीत सीताफळ चांगल्या प्रकारे वाढते. मात्र भारी,काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्कलीयुक्त जमीन या पिकास अयोग्य आहे.
जातींची निवड
बाळानगर : फळे आकाराने मोठी, गराची चव उत्तम, फळांना चांगला बाजारभाव मिळतो.
या व्यतिरिक्त सीताफळाच्या अर्का सहान, फुले पुरंदर, फुले जानकी,मेमॉब, धारूर-३, ६ या जाती लागवडीसाठी योग्य आहेत.
लागवडीचे तंत्र
- लागवडीसाठी ५ x ५ मीटर किंवा ४ x ४ मीटर अंतरावर ०.६० x०.६० x ०.६० मीटर आकाराचे खड्डे करावेत. पावसाळ्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत १ते १.५ घमेले , पोयटा माती २ ते ३ घमेले आणि १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.
- खड्डे भरल्यानंतर कलमे किंवा रोपे मध्यभागी लहान खड्डा करून लावावीत. काठीचा आधार द्यावा. पाऊस नसेल तर लगेच झारीने पाणी द्यावे.
- रोपे लावल्यानंतर काही मेली असतील तर महिन्याच्या आत नांग्या भरून घ्याव्यात. तसे शक्य न झाल्यास पुढील वर्षी जून महिन्यापूर्वी नांग्या भराव्यात. खुरपणी करून बाग तणमुक्त ठेवावी.
- पावसाचा ताण पडल्यास मधून मधून पाणी द्यावे.
छाटणी तंत्र
- सुरुवातीच्या वाढीच्या काळात झाडाला योग्य वळण द्यावे. त्यासाठी झाडावरील अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात. पावसाचा ताण जास्त पडल्यास १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे. बागेमध्ये वेळोवेळी आंतर मशागत करावी.
खत व्यवस्थापन
- पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडास बहर धरताना ५० किलो चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद (१२५ ग्रॅम), पालाश (१२५ ग्रॅम) आणि नत्राची अर्धी मात्रा (१२५ ग्रॅम) खोडापासून दूर फांद्याच्या परिघाखाली रिंग करून द्यावी.
खते झाकून पहिले पाणी द्यावे. उरलेल्या अर्ध्या नत्राची मात्रा (१२५ ग्रॅम) एक महिन्याच्या अंतराने द्यावी.
पाणी व्यवस्थापन
या झाडाला नियमित पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पहिले ३ ते ४ वर्ष उन्हाळयात पाणी दिल्यास वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारपणे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाण्याच्या १ ते २ पाळया दिल्यास भरपूर व मोठी फळे मिळतात.
आंतरपिकांचे नियोजन
- आंतर पिकामुळे जमीन झाकली जाते. त्यामुळे तणांचे नियंत्रण होते. जमिनीचा कस कायम राहतो.
- झाडे लहान असेपर्यंत त्यात जमिनीच्या मगदुरानुसार चवळी, भुईमुग, सोयाबीन, घेवडा,हरभरा इत्यादी शेंगवर्गीय पिके घेता येतात.
झाडांना वळण
- लागवड केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी तसेच फांद्या जमिनीला टेकू न देण्यासाठी मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून एक मीटरपर्यंत वरचेवर काढावेत. त्याच्या वर चारही दिशांना फांद्या विखुरलेल्या राहतील असे वळण द्यावे.
- योग्य छाटणीमुळे झाडांना चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश भेटेल, हवा खेळती राहील, तसेच झाडांची वाढ चांगली होईल, चांगली फुले व फळे येतील आणि उत्पन्न वाढेल.
- फळाची काढणी झाल्यावर ४५ ते ६० दिवसांनी छाटणी करावी. ज्या ठिकाणी फांद्याची गर्दी आहे, आडव्या फांद्या आहेत अशा फांद्या काढव्यात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.