Team Agrowon
सीताफळ काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवार (ता. २८) पासून सीताफळाची आवक सुरू झाली आहे.
पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये वडकी (ता. हवेली) येथील शशिकांत पांडुरंग फाटे यांनी विक्रीसाठी आणलेल्या सीताफळाला प्रति किलो ३६० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.
गुलटेकडी मार्केटमध्ये सीताफळाची पुणे परिसरातील पुरंदर, वडकी या भागांतून मोठ्या प्रमाणात आवक होते.
मार्केटमध्ये एक नंबरच्या मालाला प्रति किलो ३६० रुपयांचा दर मिळाला. तर दोन नंबरच्या मालाला प्रति किलो १०० रुपयांचा दर मिळाला आहे.
येत्या काळात मार्केटमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे.
एक नंबर सीताफळांचे वजन २०० ते ४०० ग्रॅम इतके भरत आहे.
मार्केटमध्ये सीताफळाची प्रतवारी करून दोन कॅरेट आणली जात आहे..