Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात जर्सी गायींचा बळी ; येडशी अभयारण्यात वाघाचा धुमाकूळ

Tipeshwar Wildlife Sanctuary : धाराशिव जिल्ह्यातील मलकापूर शिवारात वाघाने गुरुवारी (ता.१२) शेतकरी संतोष सर्जेराव लोमटे यांच्या दोन जर्सी गायींवर हल्ला केला.
Tiger Sighting
Tiger Terror Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील मलकापूर शिवारात वाघाने गुरुवारी (ता.१२) शेतकरी संतोष सर्जेराव लोमटे यांच्या दोन जर्सी गायींवर हल्ला केला. त्यात एक गाभण गाय जागीच ठार झाली, तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली. ही घटना सकाळी सात वाजता उघडकीस आली होती.

टिपेश्वर अभयारण्यातून येडशी अभयारण्यात दाखल झालेल्या वाघाने तीन महिन्यांपासून परिसरात धुमाकूळ घातला आहे. वनविभाग व रेस्क्यू पथक त्याला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र वाघ त्यांना हुलकावणी देत केलेले प्रयत्न अपयशी ठरवत आहे.

Tiger Sighting
Tiger Sighting : उक्कडगाव परिसरात वाघ दिसल्याचा दावा, वन विभाग सतर्क

वाघाने आतापर्यंत सुमारे ३० जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकरी पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी पांगरी-कारी रस्त्यालगत वाघाने वासरावर हल्ला केल्यानंतर वनविभागाने सापळा रचला होता. मात्र वाघाने चकवा देत सुमारे २५ किलोमीटर अंतर कापून मलकापूर येथे हल्ला केला.

Tiger Sighting
Tiger Footprint : तुळजापूरचा वाघ अखेर येडशी अभयारण्यात परतला

बुधवारी रात्री आठ वाजता संतोष लोमटे यांनी आपल्या गायी शेतात बांधल्या होत्या. गुरुवारी सकाळी दूध काढण्यासाठी गेल्यावर त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. एका गायीला वाघाने ८० फूट फरफटत नेऊन तिच्या मागील भागाचा फडशा पाडला होता.

तर दुसरी गाय गळ्याला गंभीर चावा घेतल्याने पाणीही पिऊ शकत नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी गायीवर उपचार केले. मात्र तरीरी तिची स्थिती गंभीर आहे. वनविभाग व रेस्क्यू पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि वाघाच्या ठशांचा शोध घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com