Farmer Cooperative Union : शेतकरी संघात डिझेल विक्रीवरून गैरव्यवहार, अध्यक्षांनी केला खुलासा

Shetkari Sagh : ग्राहकाच्या म्हणण्यानुसार डिझेलचे रोख पैसे परत केले आहेत, तर याच पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकांकडून रोख रक्कम घेतली नसल्याचे सांगितले जात आहे.
Kolhapur Shetkari Sangh
Kolhapur Shetkari Sanghagrowon
Published on
Updated on

Shetkari Sahkari Sangh : शेतकरी सहकारी संघाच्या कार्वे (ता. चंदगड) येथील पेट्रोल पंपावर ग्राहकाने डिझेल उधारीवर घेतल्याचे पैसे दिले नाहीत, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे, तर डिझेलचे पैसे रोखीने दिल्याचे ग्राहकाचे मत आहे. अधिकारी आणि ग्राहकांच्या वादात पाच ते साडेपाच लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

ग्राहकाच्या म्हणण्यानुसार डिझेलचे रोख पैसे परत केले आहेत, तर याच पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकांकडून रोख रक्कम घेतली नसल्याचे सांगितले जात आहे. लाखो रुपयांच्या गैरव्यवहारातील रक्कम कोणाकडून वसूल करायची, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपावर एका मोठ्या ग्राहकाला उधारीवर डिझेल विक्री करत असताना संबंधित पेट्रोल पंपाच्या प्रभारी असणाऱ्याने संबंधित ग्राहकाकडून कोरे धनादेश स्वीकारले होते.

दरम्यान, ज्यावेळी उधारीवरील रक्कम परत केली जाते, त्यावेळी ग्राहकाकडून घेतलेले कोरे धनादेश संबंधित ग्राहकाला परत दिले जात होते. दरम्यान, ग्राहकाकडून रोख रक्कम दिल्यानंतरही ते धनादेश परत केले नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे, तर लाखो रुपयांची थकबाकी असल्यामुळे मी त्यांचे धनादेश परत दिलेले नाहीत, असे संबंधित अधिकाऱ्याचे मत आहे. प्रत्यक्ष डिझेल विक्री झाली असतानाही त्यांची रक्कम अधिकारी आणि ग्राहकाच्या घोळात अडकून पडली आहे.

Kolhapur Shetkari Sangh
Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू

आधीच आर्थिक अरिष्ठात असणाऱ्या संघाला लोकप्रतिनिधींनी बळ देण्याची गरज असतानाच दुसरीकडे काही अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारामुळे संघाच्या कारभाराला गालबोट लागले जात आहे. यापूर्वी झालेल्या गैरव्यवहारातील लाखो रुपये रक्कम वसूल झालेली नाही. यातच आता या पाच ते साडेपाच लाख रुपयांची भर पडली आहे. ही रक्कम वसूल होणे गरजेचे आहे.

याबाबत शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविणसिंह पाटील म्हणाले की, कार्वे शाखेत डिझेलच्या विक्रीची रक्कम वसूल करण्यासाठी आवश्‍यक ती सर्व कारवाई केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली आहे. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com