Landslide Prone Areas Plans : दरडप्रवण क्षेत्रातील गावांसाठी कायमस्वरूपी योजना करा

CM Eknath Shinde : राज्यातील ४८६ दरडप्रवण क्षेत्रातील गावांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. २८) दिले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात यंदा ९६ ते १०६ टक्क्यांपर्यंतच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्यातील ४८६ दरडप्रवण क्षेत्रातील गावांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. २८) दिले.

सह्याद्री अतिथिगृहात मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची माहिती घेतली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह मंत्री आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी एसडीआरएफच्या टीमची संख्या वाढविण्याची सूचनाही करण्यात आली.

CM Eknath Shinde
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मॉन्सूनपूर्व आढावा बैठक; आपत्ती व्यवस्थापनावर केली चर्चा

तसेच टीडीआरएफच्या धर्तीवर महापालिकांनी स्वत:ची यंत्रणा तयार करण्याची सूचना करण्यात आली. राज्यात सध्या एसडीआरएफच्या आठ टीम तैनात आहेत. या टीम अपुऱ्या पडत आहेत. मागील काही वर्षांतील पावसाळ्यातील आपत्तींची संख्या पाहिल्यास त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे.

सध्याची परिस्थिती पाहता विभागनिहाय एसडीआरएफ टीम तयार करणे गरजेचे आहे. तसेच महापालिका क्षेत्रात पूर आणि तत्सम आपत्तींना तोंड देण्यासाठी ठाणे आपत्ती प्रतिसाद (टीडीआरएफ) दलाच्या धर्तीवर पथके तयार करावीत, अशी सूचना करण्यात आली. या पथकांबरोबरच बचाव कामासाठी स्थानिक तरुणांना सामावून घेत असताना त्यांना प्रशिक्षण, आवश्यक साहित्य द्यावेत.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तहानलेल्या मराठवाड्याचा दौरा फक्त सूचनांपूरता

राज्यात १५ जूनला पाऊस

यंदा राज्यात ९६ ते १०६ टक्के पाऊस पडेल तसेच १० ते ११ जून दरम्यान मुंबईत पावसाची सुरुवात होईल असे हवामान विभागाच्या वतीने बैठकीत सांगितले. १५ जून रोजी संपूर्ण राज्यात १५ जून रोजी संपूर्ण राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. 

महालक्ष्मी एक्स्प्रेससारखी अवस्था पुन्हा नको

उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेज येथील ब्रिटिशकालीन पीअर्समुळे पाणी भरल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. त्या वेळी ‘टीडीआरएफ’ने मोलाची कामगिरी बजावल्याने अनेकांचे प्राण वाचले, पण आता दक्षता घ्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून ही पीअर्स हटवावेत अशी सूचनाही केली. या बैठकीला सैन्य दल, भारतीय हवाई दल, नौदल, महापालिकांचे अधिकारी, हवामान विभागाचे अधिकारी व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com