IMD Monsoon Update : मोठी अपडेट; राज्यात जूनमध्ये पडणार जास्त पाऊस; देशातील बहुतांशी भागात जूनमध्ये चांगला पाऊस होणार

Weather Update : देशातील बहुतांशी भागात जूनमध्ये पाऊस चांगला राहील. तसेच मॉन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच १०६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारीत अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (ता. २७) जाहीर केला.
Weather
Weather Agrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज आज हवामान विभागाने दिला. जून महिन्यात राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. तर देशातील बहुतांशी भागात जूनमध्ये पाऊस चांगला राहील. तसेच मॉन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच १०६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारीत अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (ता. २७) जाहीर केला. 

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज सोमवारी (ता.२७) जाहीर केला. हवामान विभागाने १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

सुधारीत अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३२ टक्के), तर दुष्काळाची शक्यता अवघी २ टक्के असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रमुख विभागनिहाय पावसाचे वितरण लक्षात घेता ईशान्य भारतात यंदा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. पूर्वोत्तर राज्यांसह वायव्य भारताचा उत्तरेकडील भाग, पूर्व भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील 'एल-निनो' स्थिती वेगाने निवळत आहे. समुद्र पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारण स्थितीवर येत आहे. जागतिक हवामान प्रारूपानुसार (मॉडेल) मॉन्सून हंगामाच्या सुरूवातीला एल-निनो स्थिती सामान्य होणार असून, जुलै महिन्याच्या अखेरीस 'ला- निना' स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. ला-निना स्थिती मॉन्सूनच्या पावसाला पोषक समजली जाते.

Weather
Monsoon Rain : खूशखबर....माॅन्सून ५ दिवसांत केरळात येणार; माॅन्सूनसाठी पोषक हवामान; वाटचाल सुरुच राहणार

यातच विषूवृत्ताजवळील बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (इंडियन ओशन डायपोल-आयओडी) सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे. मॉन्सून हंगामातही ही स्थिती धन (पॉझिटीव्ह) होण्याची शक्यता आहे. धन 'आयओडी' भारतातील पावसासाठी पोषक ठरतो.

हवामान विभागाने आज दिलेल्या सुधारित अंदाजात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील, असा अंदाज दिला. म्हणजेच पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात केवळ जून महिन्यातच नाही तर संपूर्ण माॅन्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Weather
Monsoon Update : ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वेगाने चाल

महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच देशात जून महिन्यात सरासरी म्हणजेच ९२ ते १०८ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस राहील, असा अंदाज दिला. उत्तर आणि वायव्य भारताच्या उत्तरेकडील भागात तसेच मध्य भारताच्या पूर्वेकडील भागांमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

दुहवामान विभागाने आपल्या सुधारित अंदाजात यंदाच्या माॅन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला. नैऋत्य भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. वायव्य भारतात सरासरी तर मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस माॅन्सून काळात पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सून हंगामात ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच धन आयओडी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात यंदा चांगला पाऊस होऊ शकतो, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

देशात माॅन्सूनच्या आगमनाची आहे. देशात पुढील ५ दिवसांमध्ये माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये पुढील ५ दिवसांमध्ये माॅन्सून येईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांमध्ये माॅन्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दाखल होऊ शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com