Cotton Production : उत्तर भारतात कापूस क्षेत्रात मोठी घट

Cotton Area : साडेतीन लाख हेक्टरने क्षेत्र कमी; लागवड पूर्ण
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

चंद्रकांत जाधव

Cotton Crop : उत्तर भारतातील कापूस लागवड अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. यंदा उत्तर भारतातील कापूस लागवडीत मोठी घट दिसत असून, क्षेत्र सुमारे साडेतीन लाख हेक्टरने कमी झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.

उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब व हरियानात मिळून १६ ते १७ लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जाते. मागील हंगामात सुमारे १६ लाख ५४ हजार हेक्टरवर उत्तर भारतातील एकूण कापूस लागवड होती. सर्वाधिक नऊ लाख हेक्टरवर लागवड राजस्थानमध्ये केली जाते.

त्यापोठापाठ हरियानात सुमारे पाच ते सव्वापाच लाख हेक्टरवर तर पंजाबमध्ये सुमारे अडीच ते पावणेतीन लाख हेक्टरवर कापूस पीक असते. दरवर्षी एप्रिलअखेरीस उत्तरेकडे लागवड केली जाते. यंदाही एप्रिलअखेर लागवड सुरू झाली. पंजाबमधील भाक्रा-नांगल व अन्य धरणांतून राजस्थान, पंजाब व हरियानात कापूस लागवडीस बळ मिळत असते.

यंदाही वेळेस सिंचनासाठी या प्रकल्पांतून पाणी मिळाले असून, लागवड वेळेत सुरू झाली व पूर्णही झाली आहे. परंतु यंदाची लागवड सुमारे २० टक्के कमी झाली असून, ती सुमारे १३ लाख २० हजार हेक्टरपर्यंत असणार आहे. कापसाऐवजी धान व अन्य भाजीपाला पिके, बीजोत्पादनाकडे शेतकरी वळल्याची माहिती आहे.

Cotton Production
Cotton Sowing Update : उत्तर भारतात कापूस लागवडीत वाढ

दरामधील घट, गुलाबी बोंड अळीचे संकट
कापूस लागवड यंदा घटीमागे गुलाबी बोंड अळीचे सतत येणारे संकट व दरामधील मोठी घट कारणीभूत मानली जात आहे. कापूस पिकाची उत्पादकता उत्तरेकडे अधिक आहे. देशाच्या एकूण उत्पादकतेस उत्तर भारतातील कापूस उत्पादनामुळे चांगला आधार मिळतो.

देशाची कापूस उत्पादकता ४५० किलो रुई प्रतिहेक्टरी आहे. त्यात उत्तरेकडील राज्यांची कापूस उत्पादकता ५०० किलो रुई प्रतिहेक्टरीपर्यंत आहे. कारण या भागातील ९८ टक्के कापूस पिकास सिंचनाची सुविधा आहे. परंतु गुलाबी बोंड अळीमुळे उत्पादनास फटका बसला आहे. दरही कमी राहिले असून, उत्पादन खर्च २० ते २५ टक्के वाढला आहे. याचाही परिणाम कापूस लागवडीवर झाला आहे.

पाच लाख गाठींचे उत्पादन कमी येणार
उत्तर भारत दरवर्षी ५० ते ५२ लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन करतो. तेथे दरवर्षी सप्टेंबरमध्ये कापसाची आवक सुरू होते. परंतु नव्या किंवा २०२४-२५च्या हंगामात उत्तर भारतात सुमारे पाच ते साडेपाच लाख कापूसगाठींचे उत्पादन कमी येण्याचा अंदाज आहे, अशी माहिती मिळाली.

उत्तर भारतात कापसाखालील क्षेत्र यंदा २० टक्के कमी झाले आहे. सिंचनासाठी पाणी आहे, परंतु अनेकांनी लागवड कमी केली आहे. तर काही लहान शेतकऱ्यांनी लागवड टाळून बीजोत्पादन व अन्य बाबींवर यंदा लक्ष केंद्रित केले आहे. कापसाखालील सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र राजस्थान, पंजाब व हरियानात मिळून कमी होईल.
- महेश शारदा, माजी अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com