Team Agrowon
देशात उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्ण झाली आहे. तेथे लागवडीत १० टक्के वाढ झाली असून, एकूण क्षेत्र सुमारे १७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
देशातील लागवडदेखील किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, तेलंगणा भागातील लागवड किंचित कमी होईल.
गुजरातमध्ये मात्र लागवड दोन ते अडीच लाख हेक्टरने कमी होईल. तेथील लागवड २२ ते २३ लाख हेक्टरपर्यंत राहू शकते
महाराष्ट्रातील लागवड ४१ लाख हेक्टर एवढी अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील क्षेत्र सुमारे एक ते दीड लाख हेक्टरने कमी होईल.
राज्यात पूर्वहंगामी लागवडीबाबत अनेक भागात उत्साह नाही. कापूस बियाण्यांसंबंधी समाधानकारक स्थिती नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांना समाधानकार दर मिळालेले नाहीत.
सध्याची दरपातळी नीचांकी स्थितीत आहे. परंतु कापसाला पर्यायी चांगले पीक नाही.