Lower Terna Project : ‘निम्न तेरणा’च्या दुरुस्तीची दुसरी निविदाही निघाली

Irrigation Project Fund : धाराशिव, तुळजापूर आणि औसा तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाची दुसरी निविदाही जाहीर करण्यात आली आहे.
Lower Terna Water Project
Water ProjectAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव, तुळजापूर आणि औसा तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाची दुसरी निविदाही जाहीर करण्यात आली आहे. तीन तालुक्यातील २३ गावांतील साधारणपणे ९ हजार हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार आहे.

अशक्यप्राय वाटणाऱ्या या दुरुस्तीच्या कामासाठी निधीची अभूतपूर्व तरतूद केली. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या योजनेतील स्थापत्य विभागानंतर आता विद्युत विभागातील कामाचीही निविदा जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी आपल्या आग्रही मागणीनुसार टोकन प्रोव्हिजन अर्थात लेखाशीर्षकात निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे पहिल्यांदा स्थापत्य विभागातील ३२ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेचा टप्पा गाठता आला. स्थापत्य विभागाच्या कामापाठोपाठ आता विद्युत विभागातील १४ कोटी रुपयांच्या कामाचीही निविदा जाहीर करण्यात आली आहे.

Lower Terna Water Project
Lower Terna Irrigation Project : निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेला गती ; दुरुस्तीच्या पहिल्या निविदेला मंजुरी

त्यामुळे आता प्रत्यक्ष दुरुस्ती कामासही लवकरच सुरुवात होईल. तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यांतील २३ गावांतील साधारणपणे ९ हजार हेक्टर क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती खर्चास ११३ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली होती.

तिन्ही विभागांकडून एकत्रित अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. जलसंपदा विभागात कोणत्याही प्रकल्प दुरुस्तीसाठी एकूण तरतुदीच्या कमाल दहा टक्के निधी खर्च करता येतो. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी मात्र तब्बल ११३ कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यामुळे या प्रस्तावास खास बाब म्हणून मंजुरी मिळवून घेतली. लवकरच यांत्रिकी विभागाची निविदाही प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Lower Terna Water Project
Land Acquisition : निम्नतेरणाची उंची वाढविताना भूसंपादनाला विरोध करणार

योजनेसाठी ४२ दलघमी पाणी राखीव...

योजनेसाठी निम्न तेरणा प्रकल्पात ४२ दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे धाराशिव, तुळजापूर आणि लोहारा तालुक्यांतील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. योजनेच्या दुरुस्तीतील स्थापत्य विभागाच्या जीएसटी वगळून ३२ कोटी रुपयांच्या कामाची निविदा निघाली होती.

आता विद्युत विभागातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १४ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. पाच टप्प्यातील या योजनेत स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी आशा तिन्ही विभागाचे काम समाविष्ट आहे. स्थापत्य विभागासाठी ४० कोटी, यांत्रिकी विभागासाठी ४३ कोटी १७ लाख आणि विद्युत विभागातील दुरुस्तीसाठी ३० कोटी ३४ लाख अशी तरतूद असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com