Land Acquisition : निम्नतेरणाची उंची वाढविताना भूसंपादनाला विरोध करणार

Lower Terna Water Project : निम्नतेरणा प्रकल्पात पाणी साठवण क्षमते पैकी जवळपास तीस टक्के गाळ साचला असल्याने प्रकल्पाची पाणी क्षमता कमी झाली आहे. प्रकल्पाची पाणी क्षमता १३० दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
Lower Terna Water Project
Water ProjectAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : माकणी (ता. लोहारा) येथील निम्नतेरणा प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत अतिरिक्त भूसंपादन न करता सुरवातीला उंची वाढवण्या संदर्भात चाचपणी करण्यात आली आहे. सध्या प्रकल्प भरल्यानंतर संपादित न केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी घुसते.

जमिनी संपादित न करता उंची वाढवल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दुसरीकडे जमिनी संपादन केल्यास शेतकरी भूमिहिन होणार आहे. यामुळे या भूसंपादनाला शेतकऱ्यांना सोबत घेऊन विरोध करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिली.

निम्नतेरणा प्रकल्पात पाणी साठवण क्षमते पैकी जवळपास तीस टक्के गाळ साचला असल्याने प्रकल्पाची पाणी क्षमता कमी झाली आहे. प्रकल्पाची पाणी क्षमता १३० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. नाशिकच्या मेरी या संस्थेने केलेल्या गाळ सर्वेक्षणातून  प्रकल्पात जवळपास ३० टक्के गाळ साठला असल्याचा अहवाल यापूर्वी दिला आहे.

Lower Terna Water Project
Nimn Terna Lift Irrigation : निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेसाठीही तरतूद

निम्न तेरणा प्रकल्पाची निर्मिती सन १९८९ रोजी करण्यात आली. प्रकल्पाची निर्मिती करताना देखील धरणासाठी भूसंपादित करण्यात आलेली जमीन ही काळी असल्याने गाळ साठण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती मात्र तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांनी त्याला जुमानता धरणाची निर्मिती केली. काळी जमीन असल्यामुळे अल्पावधीतच धरणात ३० टक्के गाळसाठा झाला आहे त्याचा परिणाम पाणी क्षमतेवर झाला आहे.

धरणाची उंची वाढवायची असेल जमीन संपादित करावी लागणार आहे. सध्या धरण पूर्ण भरले तरी संपादित न केलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी येत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करत आहेत. जमीन संपादित न करता उंची वाढवली तर स्वाभाविकपणानं शेतकऱ्याच्या शेतात पाणी साठणार आहे.

Lower Terna Water Project
Nimna Terna Project : निम्न तेरणा प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी चाचपणी

यापूर्वीच या धरणासाठी भातागळी, माकणी, कानेगाव, मसलगा, नागूर, कमालपूर, उजनी, मातोळा, वांगजी, लोहटा या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. या भागातील शेतकऱ्याकडे आता अतिशय अल्प अशा जमिनी शिल्लक राहिलेल्या आहेत. उंची वाढवायची ठरली तर त्याही जमिनी जातील अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागेल त्यामुळे उंची वाढविण्याला विरोध करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

यासाठी लवकरच धरण उंची विरोधी कृती समितीची स्थापन करून पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक शिष्टमंडळ नेऊन जलसंपदा मंत्र्यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती त्यांना अवगत करणार आहोत. धरणाची उंची वाढवण्याची प्रक्रिया न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा जगताप यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com