Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Summer Groundnut : पेरणी झालेले उन्हाळी भुईमुगाचे पीक फुले लागण्याच्या तर मकाचे पीक पोटरीत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
Groundnut Flower
Groundnut Flower Agrowon

Latur News : मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाचही जिल्ह्यांत पेरणी झालेले उन्हाळी भुईमुगाचे पीक फुले लागण्याच्या तर मकाचे पीक पोटरीत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Groundnut Flower
Groundnut Sowing : पुणे विभागात साडेचार हजार हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची पेरणी

यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी व्यवहारातील पाचही जिल्ह्यांत सरासरी ७१ हजार ७०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५१ हजार ८४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेल्या या पिकांमध्ये शेतकऱ्यांनी भुईमूग व उन्हाळी मका पिकाला प्राधान्य दिले आहे.

भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर असताना प्रत्यक्षात २५ हजार ०७१ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली. दुसरीकडे उन्हाळी मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८०५७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७२७६ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मक्याची लागवड झाली आहे.

Groundnut Flower
Summer Groundnut : उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

जिल्हानिहाय उन्हाळी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी

लातूर २३९६ ११४८

धाराशिव ९५५५ २३०२

नांदेड २२ हजार ४४१ २७ हजार ५४४

परभणी १० हजार ९५८ ६३३३

हिंगोली २६ हजार ३४८ १३ हजार ०५६

३२९० हेक्‍टरवरील पिकाचे नुकसान

खरीप व रब्बीत नुकसानीचा दणका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अजूनही हाल सुरूच आहेत. १ ते २० एप्रिलदरम्यान विभागातील पाचही जिल्ह्यांत ६०० हेक्टरवरील जिरायती, ७३३ हेक्टरवरील बागायत, तर १९५७ हेक्टरवरील फळ पिके मिळून जवळपास ३२९० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com