Kharif Season : रत्नागिरीतील प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रात १५ हजार ७०० हेक्टरची घट

Kharif Sowing : रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या ई-पीकपाहणी अहवालानुसार जिल्ह्यात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र ५५ हजार २७१ हेक्टर भरले आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात दरवर्षी ७१ हजार हेक्टरपर्यंत प्रत्यक्ष पेरणी केली जाते.
Paddy harvesting
Paddy harvesting Agrowon

Ratnagiri News : रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या ई-पीकपाहणी अहवालानुसार जिल्ह्यात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र ५५ हजार २७१ हेक्टर भरले आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात दरवर्षी ७१ हजार हेक्टरपर्यंत प्रत्यक्ष पेरणी केली जाते. यंदा त्यात सुमारे १५ हजार ७०० हेक्टरची घट झाली आहे. ई-पीकपाहणीची नोंद करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यात काही अंशी वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Paddy harvesting
Paddy Pest Management : भातावरील लष्करी अळी, खोडकीड, गादमाशीचे नियंत्रण

महसूल विभागाचा ई-पीकपाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राबविण्यात येत आहे. या अ‍ॅपमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे १ कोटी ८८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यंदाच्या खरीप हंगामात ई-पीकपाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. यंदा खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीकपाहणी अ‍ॅपद्वारे पीकपाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरू करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र ५५ हजार २७१ हेक्टर असून ई-पीकपाहणी झालेले क्षेत्र साधारण ३.५० टक्के आहे.

Paddy harvesting
Paddy Crop : सिंधुदुर्गात जोरदार सरींमुळे भातपिकावरील संकट टळले  

पीकपाहणीचा अहवाल तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या सहीने जिल्हास्तरावर पाठविला जातो. महसूल आणि कृषी यांनी आपापल्यास्तरावर केलेल्या सर्व्हेक्षणात मोठी तफावत आढळली होती. ही तफावत दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कृषी विभागाला प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या अहवालात दरवर्षीच्या तुलनेत प्रत्यक्ष पीक पेरणी झालेल्या क्षेत्रात १५ हजार ७२९ हेक्टरची तूट दिसून येते. कोरोना कालावधीत प्रत्यक्ष पेरणीतील क्षेत्र वाढलेले होते. त्यानंतर तीन वर्षांनी मोठी घट झाल्याने शेतीकडील जिल्ह्यातील लोकांचा कल मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कृषीचे चाकरमान्यांना आवाहन

जिल्ह्यातील अनेक जण नोकरीनिमित्त मुंबईत निवासी आहेत. त्यांची शेती गावातील नातेवाईक करतात. त्यांच्याकडून ई-पीक नोंदणी केली जात नाही. सध्या मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवाकरिता गावात दाखल झाले आहेत. या चाकरमान्यांनी खरीप हंगामासाठी दिलेल्या कालावधीत आपली ई-पीकपाहणी नोंदणी मोबाइल अ‍ॅपद्वारे पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे. ही नोंदणी व्यवस्थित झाली तर निश्‍चितच प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होईल, अशी आशा अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com