Maize Cultivation : खानदेशात मका लागवड सुरूच

Maize Pest : खानदेशात मक्याची लागवड किंवा पेरणी यंदा वाढली आहे. ही लागवड सुरूच असून, रब्बीतील लागवड ७५ ते ८० हजार हेक्टरवर होईल.
Maize Cultivation
Maize CultivationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मक्याची लागवड किंवा पेरणी यंदा वाढली आहे. ही लागवड सुरूच असून, रब्बीतील लागवड ७५ ते ८० हजार हेक्टरवर होईल. यातच पिकात या महिन्याच्या सुरुवातीला लागवड केलेल्या मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव वाढतच आहे.

शेतकरी फवारणी घेत आहेत. एक ते सव्वा महिन्याच्या पिकात फवारणी घेऊनही अळीचा अटकाव होत नसल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. मका लागवड खरिपात विक्रमी म्हणजेच ९८ हजार हेक्टरवर झाली होती. खरिपातही दोन - तीनदा पिकात फवारणी घ्यावी लागली होती. आता रब्बीतही लागवड वाढत आहे. अजूनही लागवड सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मका लागवड ५५ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे.

यंदा लागवड सुमारे २० टक्के वाढली आहे. कारण गहू, बाजरी आदी पिके परवडेनासे झाले आहे. मक्याचे दर टिकून आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी मका लागवड वाढविली. खानदेशात गेल्या रब्बी हंगामात मक्याची लागवड सुमारे ६३ हजार हेक्टरवर झाली होती. या हंगामातही लागवड वाढली आहे.

Maize Cultivation
Maize Cultivation : देशातील शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती

परंतु अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. लागवडीनंतर पिकात २० ते २२ दिवसांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप झाला आहे. यामुळे शेतकरी अळी, किडनाशकांची फवारणी घेत आहेत. दीड महिन्याच्या पिकात दोनदा फवारणी घ्यावी लागली आहे.

एकरी दोन हजार रुपये, एवढा फवारणीसाठी एकदा खर्च आला आहे. तरीदेखील अळीचा अटकाव झालेला नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे या भागात तर जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल आदी भागात मका पिकात लष्करी अळीचा प्रकोप आहे. काही भागात पीक ४० ते ५० दिवसांचे आहे. तर काही भागात पीक ३० दिवसांचे आहे.

Maize Cultivation
Maize Fodder Cultivation : अशी करा सकस, रुचकर चाऱ्यासाठी मका लागवड ?

लष्करी अळीने शेतकरी जेरीस...

जळगाव जिल्ह्यात सुमारे २२ ते २४ हजार हेक्टर क्षेत्रात लष्करी अळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. यामुळे स्थिती आणखीच बिकट बनली आहे. कुठेही शेतकरी मार्गदर्शन, पीक पाहणी झालेली नाही. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाने मध्यंतरी मार्गदर्शन कार्यक्रम राबविला. परंतु स्वस्तातील किडनाशके, अनुदानित निविष्ठा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

कारण लष्करी अळीमुळे पिकाची वाढ खुंटत आहे. पिकाचे किमान २० ते २५ टक्के नुकसान या प्रादुर्भावाने झाले आहे. पोंग्यात अळीचे वास्तव्य आहे. पाने कुरतडलेली येत आहेत. पीक पिवळे पडत आहे. शेतकरी खते, सिंचन याबाबत कार्यवाही व्यवस्थित करीत आहे. परंतु अळीचा नायनाट होत नसल्याने शेतकरी जेरीस आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com