
Buldana News : उत्पादन वाढीसाठी कपाशी, सोयाबीन या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अनिल तारू यांनी दिला.
दगडवाडी (ता. देऊळगावराजा) येथे सकाळ-अॅग्रोवन व कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.२४) सायंकाळी कापूस व सोयाबीन पीक व्यवस्थापन विषयावर ‘अॅग्रोवन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी देऊळगावराजा तालुका कृषी अधिकारी भगवान कच्छवे, कोरोमंडलचे विभागीय व्यवस्थापक नामदेव भुजाडे, प्रसिद्धी व्यवस्थापक अमित जैन, एसएनडी समन्वयक उत्कल महांता, फायनान्स विभागाचे राजेश कुमार, पंचायत समिती कृषी अधिकारी कुणाल चिंचोले उपस्थित होते.
खरिपातील प्रमुख पिकांचे अर्थकारण, त्यांचे योग्य व्यवस्थापन, उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती डॉ. तारू यांनी दिली. भगवान कच्छवे यांनी शासकीय योजनांची माहिती व पाण्यात विरघळणाऱ्या पोषक घटकांचे महत्त्व सांगितले.
श्री. भुजाडे यांनी पाण्यात विरघळणाऱ्या खतांचे महत्त्व, मुरुगप्पा ग्रुप तसेच कोरोमंडलच्या विविध उत्पादनांची माहिती दिली. श्री. जैन ब्रँडिंगच्या साह्याने कोरोमंडल शेतकऱ्यात खतांबद्दल कशी जागरूकता निर्माण करीत आहे, याची माहिती दिली. ‘आत्मा’ तालुका व्यवस्थापक भारत नंदागवळी यांनी आत्माअंतर्गत योजना सांगितल्या.
प्रास्ताविक सचिन अवसरमोल यांनी केले. सूत्रसंचालन गजानन घुगे यांनी केले. आभार दीपक मगर यांनी मानले. प्रवीण लोंढे, आकाश शिंब्रे यांनी पुढाकार घेतला. यावेळी गजानन घुगे, उद्धव घुगे, रामेश्वर जायभाये, सुधाकर जायभाये, जगदीश जायभाये, मार्तंड जायभाये, विष्णू वाहक, बंडू जायभाये, राजेश जायभाये, राजू पवार, शिवानंद जायभाये, बबन जायभाये, दत्तू पांडव, अर्जुन जायभाये, शिवदास कदम, संतोष डोईफोडे, समाधान डोईफोडे, विकास घुगे, विष्णू जायभाये, कृषी सहायक श्रीमती मेहेत्रे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.