Emergency Situation : आपत्कालीन परिस्थितीत समन्वय ठेवा : डॉ. दयानिधी

Flood Situation Update : यंदा हवामान विभागाने सुमारे १०६ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविला आहे. सांगली जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता, संभाव्य पूरस्थितीमध्ये संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे,
Collector Raja Dayanidhi
Collector Raja DayanidhiAgrowon

Sangli News : यंदा हवामान विभागाने सुमारे १०६ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविला आहे. सांगली जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता, संभाव्य पूरस्थितीमध्ये संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्याच्या मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी सुमितकुमार उपस्थित होते.

Collector Raja Dayanidhi
Water Stock : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यात यदाकदाचित पूर परिस्थिती निर्माण झाली तर बाधित व्यक्तिंच्या पुनर्वसनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच चाऱ्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर निवारा केंद्रामध्ये एकत्र कुटुंब कसे राहील, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी.

शासकीय कार्यालयातील दप्तर पुराच्या पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. आपत्कालीन स्थितीत नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे महसूल यंत्रणेने वेळेत व अचूक करावेत.

Collector Raja Dayanidhi
Drought situation in Kolhapur : पाणीदार कोल्हापुरला दुष्काळाच्या झळा, आजरा तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा

ते म्हणाले, की आरटीओने तहसीलनिहाय पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, तसेच चालकांची अद्ययावत यादी तयार करावी. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी निवृत्त सैनिकांसह एनसीसी विद्यार्थ्यांची बचत कार्यात मदत घ्यावी. पूर परिस्थितीत कार्यरत असणाऱ्या बोटींची तपासणी त्वरित करावी.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, की आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या मदतीसाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. आवश्यकता भासल्यास बाहेरून अतिरिक्त मदत घेतली जाईल. नदाफ यांनी आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीच्या आढाव्याचे सादरीकरण केले. जिल्हा परिषद, मनपा तसेच पाटबंधारे विभागाने केलेल्या उपाययोजनांबाबत विभाग प्रमुखांनी माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com