Solapur News : स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) ( ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय, पाणी गुणवत्ता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या कामामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छतेसह सर्वच कामात शाश्वत काम करणे, ही जबाबदारी आहे आणि हेच संत गाडगेबाबा (Sant Gadagebaba) यांना अभिवादन ठरेल, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने नुकतेच संत गाडगेबाबा जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर बोलत होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, बांधकामचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा जलसंधारण अधिकारी पंडित भोसले, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, फुलचंद नागटिळक आदी उपस्थित होते.
श्री. कोहिनकर म्हणाले, जलसुरक्षक दैनंदिनीमधील माहिती अद्ययावत ठेवून सर्व जलसुरक्षक यांनी गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले, तर काम सुकर होईलच, पण स्वतःलाही कामाचे समाधान मिळेल, असे सांगितले.
जिल्ह्यातील सर्व जलसुरक्षक यांनी ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जलसुरक्षक दैनंदिनीच्या माध्यमातून दक्षता घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी कार्यकारी अभियंता कुलकर्णी व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचीही भाषणे झाली.
जलसुरक्षक दैनंदिनीचे प्रकाशन
यावेळी जलसुरक्षक दैनंदिनी २०२३ तसेच जल जीवन मिशन व क्षेत्रीय पाणी गुणवत्ता तपासणी संच (एफटीके) विषयी पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील जलसुरक्षकांचे प्रतिनिधी म्हणून खेड ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक संतोष दारेकर, करकंब गावात शाश्वत स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविणारे स्वच्छतादूत, अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे समाजशास्त्रज्ञ आनंद मोची, स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविणा-या मुख्याध्यापक व शिक्षकांचा तसेच संत गाडगेबाबा महाराज यांच्या वेशभूषेतील फुलचंद नागटिळक यांचा स्वच्छतेविषयी जनजागृतीच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.