Agriculture Technology : महिंद्राचे ‘6RO पॅडी वॉकर ट्रान्सप्लांटर’ बाजारात दाखल

Market Update : महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफईएस)द्वारे सहा ओळींमध्ये भात रोपांची पुनर्लागवड करणारे महिंद्रा 6RO पॅडी वॉकर हे यंत्र बाजारात आणले आहे.
Paddy Walker Transplanter
Paddy Walker TransplanterAgrowon

Pune News : महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफईएस)द्वारे सहा ओळींमध्ये भात रोपांची पुनर्लागवड करणारे महिंद्रा 6RO पॅडी वॉकर हे यंत्र बाजारात आणले आहे.

या पूर्वी महाराष्ट्रात 4RO वॉक बॅक ट्रान्सप्लांटर (MP461) आणि 4RO राइड-ऑन (प्लांटिंग मास्टर PADDY 4RO) ही दोन उत्पादन उतरवली होती. त्यानंतर सोमवारी (ता. १७) भात लावणी तंत्रज्ञानातील पुढील पाऊल म्हणून नवीन महिंद्रा 6RO पॅडी वॉकर बाजारात आणले आहे.

Paddy Walker Transplanter
Agriculture Technology : बहुउपयोगी पॉवर वीडर...

राज्यामध्ये भात हे पीक कोकण, विदर्भातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातरोपांच्या पुनर्लागवडीसाठी मजुरांची कमतरता ही मोठी समस्या बनत असताना महिंद्रा 6RO पॅडी वॉकर महत्त्वाचे ठरणार आहे.

Paddy Walker Transplanter
Agriculture Technology : जिवाणू संवर्धक वापरण्याच्या पद्धती

हे लहान यंत्र एकावेळी सहा ओळी लावण्यासाठी आणि उत्कृष्ट चालक कार्यक्षमतेसाठी विकसित केले आहे. त्यामध्ये टिकाऊ गिअरबॉक्स आणि चार लिटर क्षमतेचे शक्तिशाली इंजिन आहे.

स्वतःच्या शेतासोबत भाडेपट्टीवर देण्याच्या दृष्टीने या यंत्राचा परतावा कालावधी २ वर्षांचा असून, किमान ऑपरेटिंग क्षेत्र फक्त २०० एकरांसह फायद्याचा सौदा ठरू शकतो. महिंद्राच्या विस्तृत वितरक जाळ्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या यंत्राच्या खरेदीसाठी आवश्यक वित्तपुरवठ्यासाठी विविध फायनान्स कंपन्यांकडून सेवाही उपलब्ध करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com