Agriculture Technology : जिवाणू संवर्धक वापरण्याच्या पद्धती

Biofertilizers : माती, शेणखत, गांडूळ खतात मिसळून जिवाणू संवर्धक मिसळता येते. ठिबक सिंचनाद्वारे जिवाणू संवर्धक पिकांना देता येते. ऊस, बटाटा, हळद, आले इत्यादी पिकांच्या बेण्यास जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक हे शिफारस केलेल्या पिकांसाठी वापरावीत.
Biofertilizers
BiofertilizersAgrowon
Published on
Updated on

एस. एस. ढवाण, एस. यू. कोकरे-देसाई

Use of Biofertilizers :

बीजप्रक्रिया

प्लॅस्टिकच्या घमेल्यामध्ये १० किलो बियाणे घेऊन त्यावर १०० मिलि जिवाणू संवर्धक शिंपडून हलक्या हाताने सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात लावावे. बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर बियाणे काढून थोडा वेळ सावलीत सुकवावे.

याप्रकारे एक किंवा एकापेक्षा जास्त जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करता येते. सोयाबीन, भुईमुगाच्या १० किलो बियाण्यास ५० मिलि जिवाणू संवर्धक वापरावे.

इतर पद्धती

रोपांची मुळे बुडविणे

ज्या पिकांमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड केली जाते, त्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. एक लिटर जिवाणू संवर्धक १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.

पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे अर्धा तास द्रावणात बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.

माती, शेणखत, गांडूळ खतात मिश्रण

माती, शेणखत, गांडूळ खतात मिसळून जिवाणू संवर्धक देता येते. ४०० ते ६०० किलो ओलसर माती किंवा शेणखत किंवा गांडूळ खतामध्ये एक लिटर जिवाणू संवर्धक मिसळून रात्रभर ठेवावे. पेरणीपूर्वी किंवा जमिनीस पाणी देण्यापूर्वी हे मिश्रण सरीमध्ये टाकावे.

Biofertilizers
Biofertilizer Use : उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर कसा करावा?

पिकांच्या मुळांभोवती वापर

उभ्या पिकास जिवाणू संवर्धक स्प्रे पंपाच्या साहाय्याने देता येते. २०० लिटर पाण्यात एक लिटर जिवाणू संवर्धक मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण सकाळी, सायंकाळी पिकांच्या मुळांजवळ नोझल काढलेल्या पंपाच्या साह्याने फवारावे.

ठिबक सिंचनाद्वारे वापर

ठिबक सिंचनाद्वारे जिवाणू संवर्धक पिकांना देता येते. एक एकर क्षेत्रासाठी १ लिटर जिवाणू संवर्धक ठिबक सिंचनाच्या यंत्रणेतून द्यावे. फळपिके, ऊस, कापूस या पिकांना ही पद्धत उपयुक्त आहे.

बेणे प्रक्रिया

ऊस, बटाटा, हळद, आले इत्यादी पिकांच्या बेण्यास जिवाणू संवर्धका प्रक्रिया करावी. ५०० लिटर पाण्यात १ लिटर जिवाणू खत मिसळून द्रावण तयार करावे.

या द्रावणात पिकाचे बेणे अर्धा तास बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.

Biofertilizers
Biofertilizer Use : उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर कसा करावा?

वापरताना काळजी

जिवाणू संवर्धक शिफारस केलेल्या पिकांसाठी वापरावीत. बाटलीवर दिलेल्या अंतिम दिनांकापूर्वी वापरावीत.

रायझोबियम जिवाणू संवर्धक पिकाचा गट पाहून वापरावे.

कीडनाशक, बुरशीनाशके, तणनाशके आणि रासायनिक खतांच्यासोबत मिसळू नयेत.

उपयुक्त जिवाणू जिवंत राहण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा, सेंद्रिय पदार्थ असावेत.

जिवाणू संवर्धकाचे फायदे

जमिनीची नैसर्गिक, जैविक सुपीकता टिकून राहते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

संवर्धकामध्ये जमीन, पाणी आणि पिके यांसाठी अपायकारक अशी रसायने नसतात. त्यामुळे उपयुक्त जीवजंतू व मित्र कीटकांना अपाय होत नाही.

सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होते. जमिनीचा पोत सुधारतो. नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

पिकाच्या उत्पादनात १५ ते ३० टक्के वाढ होते.

पिकाची रोग, कीड प्रतिकारशक्ती वाढते. संजीवकांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते. पिकाची वाढ चांगली होते.

जिवाणू संवर्धक तुलनेने स्वस्त असतात, त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते.

नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूमुळे नत्र पिकांना उपलब्ध करून देतात. प्रती हेक्टरी २५ ते ३०० किलोपर्यंत नत्र उपलब्ध केले जाते.

काही रासायनिक खते पूर्णतः पिकांना उपलब्ध होत नाहीत. जसे की, स्फुरदयुक्त रासायनिक खतांच्या उपलब्धतेचे प्रमाण १५ ते २० टक्के इतके आहे. उर्वरित ८५ ते ८० टक्के स्फुरद जिवाणू संवर्धकाच्या वापराने उपलब्ध होऊ शकते.

झिंक विरघळविणारे जिवाणू संवर्धक जमिनीतील खनिज स्वरूपातील झिंक विरघळून पिकांना उपलब्ध करतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.

एस. एस. ढवाण, ९५०३०२२३१३

(वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती, जि.पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com