Electricity Bill Recovery : महावितरणची थकबाकी वसुली मोहीम वेगात

Mahavitaran : थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्या चालूसह थकीत वीजबिलांचा भरणा तत्काळ करावा; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा महावितरणने दिला आहे.
Electricity Meter
Electricity MeterAgrowon

Pune News : महावितरणच्या बारामती मंडलांतर्गत भोर, पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर व इंदापूर तालुक्यांत बिगरशेती वीजग्राहकांची थकबाकी ३०५ कोटींवर गेली असून, ती वसूल करण्यासाठी कंपनीने धडक वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्या चालूसह थकीत वीजबिलांचा भरणा तत्काळ करावा; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा महावितरणने दिला आहे.

बारामती मंडलात महावितरणचे बारामती, केडगाव व सासवड असे तीन विभाग आहेत. बारामती विभागात थकबाकीदार ग्राहकांची संख्या ५१०५० इतकी असून, त्यांच्याकडे १८३ कोटी थकले आहेत.

त्यात घरगुती ४१९३२ (३ कोटी ६१ लाख), व्यावसायिक ४६९८ (१ कोटी ५ लाख), लघुदाब औद्योगिक ५८८ (६४ लाख), दिवाबत्ती १६७९ (१२१ कोटी ४९ लाख), सार्वजनिक पाणीपुरवठा ३९९ (५४ कोटी ८० लाख), सार्वजनिक सेवा १३३३ (१ कोटी ३९ लाख) व इतर वर्गवारीच्या ४२१ ग्राहकांकडे १० लाख असे मिळून थकबाकीचा आकडा १८३ कोटींवर गेला आहे.

Electricity Meter
Agriculture Electricity Issue : विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिकांना देता येईना

केडगाव विभागात थकबाकीदार ग्राहकांची संख्या ६२१४३ इतकी असून, त्यांच्याकडे ९० कोटी २२ लाख थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ५२६८६ (६ कोटी ८२ लाख), व्यावसायिक ५०७४ (१ कोटी ७९ लाख), लघुदाब औद्योगिक १०४५ (१ कोटी ६६ लाख), दिवाबत्ती ११३८ (४४ कोटी १४ लाख), सार्वजनिक पाणीपुरवठा ४२४ (३३ कोटी ७ लाख), सार्वजनिक सेवा १२२८ (२ कोटी ४० लाख) आणि इतर वर्गवारीच्या ५४८ ग्राहकांकडे ३२ लाख असे मिळून थकबाकीचा आकडा ९० कोटींवर गेला आहे.

Electricity Meter
Electricity Meter : ग्राहकांना वीज मीटर देण्यास टाळाटाळचा आरोप

तसेच सासवड विभागात ३१९९९ वीजग्राहकांकडे ३२ कोटी २८ लाख थकबाकी आहे. त्यात घरगुती २६९४४ (२ कोटी ४२ लाख), व्यावसायिक २४११ (७५ लाख), लघुदाब औद्योगिक ३०७ (१९ लाख), दिवाबत्ती ८३९ (१६ कोटी ४ लाख), सार्वजनिक पाणीपुरवठा ३६१ (११ कोटी ४१ लाख), सार्वजनिक सेवा ७५९ (१ कोटी २४ लाख) व इतर वर्गवारीच्या ३७८ ग्राहकांकडे २० लाख असे मिळून थकबाकी ३२ कोटी २८ लाख इतकी झाली आहे.

भुर्दंड टाळण्यासाठी वीजबिल भरा

वीजबिल वसुलीसाठी महावितरणने शाखानिहाय पथके तयार केली असून, ग्राहकाच्या दारात जाऊन वसुली केली जात आहे. एकदा वीजपुरवठा खंडित झाला की तो सुरू करण्यासाठी पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यांचे वीजबिल घरबसल्या ऑनलाइन किंवा नजीकच्या वीजबिल भरणा केंद्रावर तत्काळ भरुन सहकार्य करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com