Baliraja Electricity Scheme : बळीराजासाठी मोफत वीज योजनेत मोठी भर; महावितरणला २,००० कोटींचा निधी

Baliraja Free Electricity Scheme : विधानसभेच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपोटी महावितरण कंपनीस राज्य सरकारने दोन हजार कोटी ७८ लाख रुपये देण्यास मान्यता दिली आहे.
Baliraja Free Electricity Scheme
Baliraja Free Electricity Scheme Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपोटी महावितरण कंपनीस राज्य सरकारने दोन हजार कोटी ७८ लाख रुपये देण्यास मान्यता दिली आहे.

राज्यातील कृषिपंपधारक ग्राहकांना मोफतवीज पुरवठा करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील ४६ लाख कृषिपंपधारक ग्राहकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Baliraja Free Electricity Scheme
Baliraja Free Electricity Scheme : ‘बळीराजा’चा ११ लाख ग्राहकांना लाभ

या योजनेअंतर्गत ग्राहकांना मोफत वीजपुरवठा करून त्याची प्रतिपूर्ती राज्य सरकार करेल, अशी तरतूद करण्यात आली होती. एप्रिल २०२४ पासून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज पुरविल्याबद्दल महावितरणला अग्रिम स्वरूपात रक्कम देण्यात येणार होती.

त्यामुळे महावितरणला वीजबिल सवलतीपोटी ६९८५ आणि वीजबिल माफीपोटी ७ हजार ७७५ कोटी रुपये असे प्रतिवर्षी १४ हजार ७६० कोटी रुपये देण्याचा निर्णयही झाला होता. या योजनेच्या कालावधीत बदल झाल्यास या रकमेतही बदल करण्याची तरतूद शासन निर्णयात करण्यात आली होती.

Baliraja Free Electricity Scheme
CM Baliraja Free Electricity : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा; निधी वितरणाला मंजूरी

याआधी महावितरणला ६ हजार ४२५ कोटी २२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. सध्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ११ हजार १८५ कोटी रकमेपैकी २ हजार कोटी ७८ लाख रुपये वितरित करण्यास शासन आदेशाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील कृषिपंप धारक शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना आणली होती.

लाडकी बहीण योजनेप्रमाणे या योजनेलाही निकष लावले जातील, असे बोलले जात होते. मात्र, महावितरणला देण्यात येणारी १४ हजार कोटी रुपयांची प्रतिपूर्ती राज्य सरकारने हळूहळू करत आणल्याने ही योजना सुरू राहील अशी शक्यता आहे. ही योजना २०२९ पर्यंत राबविणार असल्याचा शासन निर्णय याआधीच राज्य सरकारने काढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com