Free Electricity
Free ElectricityAgrowon

Baliraja Free Electricity Scheme : ‘बळीराजा’चा ११ लाख ग्राहकांना लाभ

Electricity Update : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजनेचा लाभ ७.५ एचपीपर्यंत विद्युत भार असणाऱ्या कृषी वीज ग्राहकांना मिळणार आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजनेचा लाभ ७.५ एचपीपर्यंत विद्युत भार असणाऱ्या कृषी वीज ग्राहकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ७.५ एचपीपर्यंत विद्युत भार असणाऱ्या एकूण ११ लाख ४६ हजार ९०३ कृषी ग्राहकांना सुमारे ५१२.३६ कोटी रुपयांचे त्रैमासिक बिले माफ होऊन योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी गुरुवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आदींसह विविध योजनांच्या माहितीबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी उपायुक्त जगदीश मिनियार, उपायुक्त सुरेश वेदमुथा आदी उपस्थित होते.

Free Electricity
Free Electricity : बळीराजा मोफत वीज योजनेत लातुरात १ लाख ४१ हजार लाभार्थी

विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर विभागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात २६ लाख २४ हजार ४६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील २४ लाख ३९ हजार ५०४ अर्जांना मंजुरी देण्यात आली. अंशत: ९१ हजार ७३ अर्ज नाकारण्यात आले आहेत.

कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तत्परतेने या अर्जांनाही मंजुरी देण्यात येणार आहे. विभागात एकूण आतापर्यंत ९४ टक्के अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विभागातील २० हजार ६६० पदे विविध आस्थापनांनी अधिसूचित केली आहेत. २० हजार ४६२ उमेदवारांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली असून, यामधील ३ हजार ५४९ उमेदवारांची निवड करण्यात आली.

Free Electricity
Free Electricity Scheme : मोफत वीज योजनेस मान्यता

यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात अग्रेसर आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात उज्ज्वला योजनेअंतर्गत एकूण १४ लाख ७ हजार ३२५ गॅस जोडणीधारकांची संख्या आहे. यामध्ये ७ लाख १० हजार ३२४ गॅस जोडणीधारकांची ई-केवायसी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात शैक्षणिक २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात २४ हजार ५०० प्रवेशीत मुली अपेक्षित आहे. यापैकी अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अंदाजे १६ हजार विद्यार्थ्यांना १०० टक्के शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात मुलींना मोफत तांत्रिक शिक्षण योजनेअंतर्गत शैक्षणिक २०२४-२५ साठी ११ हजार विद्यार्थ्यांना असा लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे.

तीर्थाटन योजनेच्या अर्जांची छाननी सुरू

मुख्यमंत्री तीर्थाटन योजनेसाठी जिल्ह्यांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारणे व छाननी करण्याची कार्यवाही सुरू आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारणे व छाननी करण्याची कार्यवाही तसेच योजनेसाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली श्री. गावडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com