Revenue Department Reforms : विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महसूल सुधारणांसाठी समित्या

Maharashtra Governance : महसूल विभागातील विविध बाबी, रचना, कार्यपद्धती, महसुली कायदे आदींमध्ये सुधारणा करण्यासाठी ६ विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा समित्या स्थापन करण्यात येत आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Agrowon
Published on
Updated on

Pune News : महसूल विभागातील विविध बाबी, रचना, कार्यपद्धती, महसुली कायदे आदींमध्ये सुधारणा करण्यासाठी ६ विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा समित्या स्थापन करण्यात येत आहेत. समित्यांच्या विविध शिफारशींवर चर्चा करून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्टपासून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी दिली.

मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, ‘‘जिल्हाधिकारी सध्या विविध २०० समित्यांचे अध्यक्ष आहेत. या समिती अध्यक्षांच्या कामांचे विकेंद्रीकरण करण्याचा विचार आहे. यामधील बदलांसह महसूल विभागातील कामांचे सुसूत्रीकरण आणि सक्षमीकरणासाठी सहा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा समित्या स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये अमरावती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ ते १५ केपीआय करायचे आहेत.

Devendra Fadnavis
Revenue Department : संगमनेरला महसूल मंडळाची फेररचना होणार

यामध्ये तहसीलदारांपासून प्रत्येकाचे स्वतंत्र केपीआय असणार आहेत. नागपूर आयुक्त बेस्ट प्रॅक्टिसेसचे संकलन, परीक्षण करून राज्यस्तरावर नेण्यासाठी गुणात्मक काम करेल. पुणे आयुक्त जीवनशैलीतील सुलभीकरण (ईज ऑफ लिव्हिंग) अडीअडीचणी आणि अकार्यक्षमता दूर करण्यासाठीच्या पद्धतींच्या शिफारशी करणार आहेत.

कोकण आयुक्त जिल्हा नियोजन समिती कशी कार्यक्षम करता येईल सुसूत्रतेच मॉडेल एसओपी करणार आहेत. तर नाशिक आयुक्त कार्यालय रचनेमध्ये बदल, ब्रिटिशकालीन पद्धतींमध्ये करावयाचे बदल, अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांच विकेंद्रीकरणावर काम करेल.

Devendra Fadnavis
Revenue Department: महसूल कार्यालयात एजंट नको, सुविधा देणारा पाहिजे

या सहा समित्या उपगट करून ३० जूनपर्यंत शिफारशी अहवाल महसूल सचिवांना पाठविणार आहेत. यावर जुलैमध्ये बैठक घेऊन, कार्यपद्धती अंतिम करून १५ ऑगस्टपासून, नवीन कार्यप्रणाली सुविधा लागू करण्यात येतील यातून लोकाभिमुख प्रत्येकी २ सेवा लोक केंद्रीत १२ सेवांचा समावेश केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महसूल विभागाची स्वतंत्र वाहिनी काढा

सर्वसामान्य नागरिकांना सुटसुटीतपणे आणि सोप्या भाषेत महसूल सेवा, कायदे माहिती व्हावेत, सात-बारा उतारे देखील अनेकांना माहीत नसतात, त्यांना शिक्षित करण्यासाठी आपली स्वतःची एक वाहिनी सुरू करा. आपल्यात देखील अनेक ‘कलाकार’ आहेत. त्यांनी समाजमाध्यमांवर ४५-६० सेकदांचे माहितीचे व्हिडिओ रिल्स टाकत जा. हे प्रभावीपणे शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com