
Ahilyanagar News : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याकरून गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. महसूल मंडळाची फेररचना झाल्याशिवाय अप्पर तहसील कार्यालय होणार नाही, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
मात्र महसुली मंडळाची फेररचना हा राज्याच्या महसूल विभागाचा धोरणात्मक निर्णय असतो, संगमनेर बाबतीत असा कोणताही निर्णय महसूल विभागाने अद्यापपर्यंत घेतलेला नाही, असा दावा कृती समितीने केला आहे.
राज्यातील काही तालुक्यांत अप्पर तहसील कार्यालये होत आहेत. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथेही अप्पर तहसील कार्यालय होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. मात्र या कार्यालयाला संगमनेर तालुक्यातूनच विरोध झाला. तालुक्याचे दोन तुकडे करण्याचा डाव असल्याचा आरोप करत संगमनेरला आंदोलन सुरू आहे.
या बाबत दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले, की अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात शासन स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. जनतेच्या सुविधेकरिता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे. आश्वी बरोबरच घारगाव, साकूर येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे, अशी मागणी पुढे आली असल्याकडे लक्ष वेधून या बाबत ग्रामस्थांच्या असलेल्या भावनांचा कुठेही अनादर न करता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही.
महसूली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे कोणतेच मुद्दे राहिलेले नाहीत ते फक्त जनतेला पुढे करून अस्तित्वाची लढाई करून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. ज्यांनी वर्षानुवर्षे मक्तेदारी आणि दहशत निर्माण केली त्यांना जनतेन झुगारून दिले आहे. पराभव पचवता येत नसल्यामुळेच अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर राजकारण केले जात असल्याचा आरोप केला.
‘लोकांची दिशाभूल करू नये’
अखंड संगमनेर तालुका कृती समितीने सांगितले, की संगमनेर तालुक्यामध्ये उद्रेक झाल्यानंतर या विषयावरून लक्ष भरकटविण्यासाठी आमदार महोदय आता जनतेला महसुली मंडळाचे गाजर दाखवत आहेत. या मुद्यावर लोकांची दिशाभूल करू नये. हे करण्यापेक्षा आमदारांनी आश्वी बुद्रुक अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव रद्द झाला असल्याचे पत्र दाखवावे आणि महसुली मंडळाची फेररचना होणार असल्याचा महसूल विभागाचा आदेश दाखवावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.