Maharashtra Sugarcane Season : यदांच्या ऊस गळीत हंगामाची काय आहे स्थिती, साखरेचे उत्पादन घटले की वाढले

Sugar Production : यंदा साखर उताऱ्यात घट होईल असेच बोलले जात होते परंतु हंगाम फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षी इतकाच सरासरी ९.८३ टक्के राहिला आहे.
Maharashtra Sugarcane Season
Maharashtra Sugarcane Seasonagrowon

Maharashtra sugarcane : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उसाच्या उताऱ्यात घट होत असल्याचे जाणवत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागच्या वर्षीपेक्षा १५ लाख टनांनी साखरेचे उत्पादन घटणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान साखर हंगाम सुरू झाल्यानंतर प्रामुख्याने साखर उताऱ्यात घट होईल असेच बोलले जात होते परंतु हंगाम फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षी इतकाच सरासरी ९.८३ टक्के राहिला आहे.

दरम्यान साखर संकुलाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यात वाढ होत असल्याने कारखानदारांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाचा गाळप हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नवीन लागणी होण्यास परिणाम झाला. यामुळे राज्यातील अनेक भागात पाण्याअभावी ऊस लागवड लांबली, तर यंदा पाऊसमान कमी झाल्याने उसाच्या वाढीवरही विपरीत परिणाम झाला. याचा थेट फटका साखर उताऱ्यावर दिसून आला.

यंदा साखर कारखाने सुरू झाल्यापासून साखरेचा उतारा कमी राहिल असे बोलले जात होते परंतु तुलनेत मागच्या वर्षासारखाच यंदाही उतारा राहताना दिसत आहे. साखर उत्पादन घटेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, १४ फेब्रुवारीपर्यंत राज्यात ९.८३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी देखील ९.८३ टक्के साखर उतारा मिळाला होता. साखर उतारा वाढल्याने साखरेचे उत्पादन देखील वाढण्याची अपेक्षा साखर कारखानदारीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्राच्या धोरणाने कारखानदार अडचणीत

परंतु केंद्र सरकारने साखरेवर निर्यात बंदी आणल्याने साखरेचे दर उतरल्याने साखर कारखान्यांनी तयार केलेली साखर अद्याप गोडाऊनमध्ये असल्याचे चित्र आहे. यामुळे मागच्या सहा महिन्यात ४२ रुपयांवर असलेले साखरेचे दर ३५ रुपयांवर आले आहेत. याचा थेट परिणाम साखर कारखानदारांसह शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. यंदा काही कारखान्यांना एफआरपीही देण्यासही अडचण येण्याची शक्यता आहे.

राज्यात ७९०.६५ लाख टन उसाचे गाळप

राज्यातील २०७ कारखान्यांनी यंदा राज्यात आतापर्यंत १०३ सहकारी व १०४ खासगी अशा एकूण २०७ कारखान्यांनी मिळून ७९०.६५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. यातून ७७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, चार कारखान्यांनी आपला गाळप हंगाम आटोपता घेतला आहे. यात सोलापूर विभागातील १, छत्रपती संभाजीनगर विभागातील २ व नांदेड विभागातील एका कारखान्याचे धुराडे बंद झाले आहे.

गेल्या वर्षी १०६ सहकारी, तर १०५ खासगी अशा २११ कारखान्यांनी मिळून ८६५.९६ लाख टन उसाचे गाळप करत ८५.१२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. तर, १५ कारखान्यांनी आपला हंगाम पूर्ण केला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com