Revenue Administration : महसूलच्या सकारात्मक वृत्तीमुळे देशात महाराष्ट्राची ओळख

Revenue Department : कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते. राज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रम, वृत्ती व सचोटीवर ठरते.
Revenue Administration
Revenue DepartmentAgrowon
Published on
Updated on

Nanded News : कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते. राज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रम, वृत्ती व सचोटीवर ठरते. महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केले.

महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २१ ते २३ फेब्रुवारी नांदेडमध्ये होत आहेत. शुक्रवारी (ता. २१) गुरूगोविंद सिंघजी स्टेडियम येथे प्रारंभ झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंद तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप गावडे, अरुण डोंगरे, जीएसटीचे सहआयुक्त अभिजित राऊत,

Revenue Administration
Revenue Department: साहेब आता थेट जनतेत! सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालये सोडून बाहेर जाण्याचे आदेश

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर आयुक्त महसूल नैना बोंदार्डे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अपर आयुक्त प्रदिप कुलकर्णी, नितीन महाजन, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, मेघना कावली, महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.

राजेशकुमार यांनी बारा वर्षानंतर या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचा आनंद व्यक्त केला. या स्पर्धांचे नियोजन करणारे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, यांनी दर्जेदार स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

Revenue Administration
Revenue Department : संगमनेरला महसूल मंडळाची फेररचना होणार

नांदेडमध्ये असणाऱ्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, निवासाची व्यवस्था यामुळे याठिकाणी केवळ महसूलच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंद तिडके, आमदार बालाजी कल्याणकर यांनी शुभेच्छापर संबोधन केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे प्रतिनिधी पोपंटवार, महाराष्ट्र राज्य नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष किरण अंबेकर, डॉ. सचिन खल्लाळ, अप्पर जिल्हाधिकारी संवर्गाचे प्रतिनिधी दीपाली मोतियेळे यांनीही संबोधित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com