Maharashtra Government: फुले दाम्पत्याला भारतरत्नसाठी महाराष्ट्राची केंद्राला शिफारस

Proposals in the Legislative Assembly: महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. विधानसभेत हा प्रस्ताव सोमवारी एकमताने मंजूर करण्यात आला.
Mahatama Jyotirao Phule and Savitribai Phule
Mahatama Jyotirao Phule and Savitribai PhuleAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव विधानसभेत सोमवारी (ता. २४) एकमताने करण्यात आला.

Mahatama Jyotirao Phule and Savitribai Phule
Punjabrao Deshmukh Award: डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराने गडकरींचा गौरव

राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

Mahatama Jyotirao Phule and Savitribai Phule
Punyabhushan Award 2025: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार २०२५

राजकारण, कला, साहित्य, विज्ञान क्षेत्रातील नामवंतांना पुरस्काराने गौरविण्यात येते; क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे.

त्यामुळे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com