
Amravati News: आगामी काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी, त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. शनिवारी (ता. २२) या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कमलताई गवई उपस्थित होते.
श्री. गडकरी पुढे म्हणाले, की डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यातूनच मागास भागाचा बदल घडविणे शक्य झाले. सामाजिक सुधारणा या काळ बदलविणाऱ्या असतात.
त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळते. समाजाप्रती त्यांचा असलेला दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करण्यात येत आहे.’’ पुरस्काराच्या मिळालेल्या पाच लाख रुपयांमध्ये वीस लाख रुपयांची भर घालून त्यातून दरवर्षी पाच शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात यावा, असे आवाहन यावेळी मंत्री गडकरी यांनी केले.
सुरवातीला हर्षवर्धन देशमुख यांनी संस्थेचे कार्य आणि पुरस्काराबद्दल माहिती दिली. यावेळी मिथिला कवीश्वर, श्रीमती राठोड, वैष्णवी मानवटकर, वैष्णवी कदम, समीक्षा नागापुरे, धनश्री मोये, आयुष्य दिवाण, सौम्या राऊत, दीप्ती काळमेघ यांना विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट महिला शेतकरी वंदना धोत्रे आणि वंदना वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचा सत्कार करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.