Maharashtra Rain : राज्यात हलक्या पावसाची शक्यता

Maharashtra IMD alert : आज (ता.२१) विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain AlertAgrowon
Published on: 
Updated on: 

Maharashtra Forecast News : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने पावसाला पोषक हवामान झाले आहे. राज्यात ढगाळ हवामानसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता.२१) विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Maharashtra Rain Alert
Kharif Season : पावसाची मोठी दडी; पिकांची वाढ खुंटली..!

ईशान्य मध्यप्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आला आहे. मॉन्सूनचा आस जैसलमेर, कोटा कमी दाबाचे केंद्र, रायपूर, गोपालपूर ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

Maharashtra Rain Alert
Crop Damage In Akola : अकोला जिल्ह्यात 'अवकाळी पावसा'मुळे १६ कोटी ५५ लाखांचे नुकसान

राज्यात ढगाळ हवामान होत असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २१) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांसह पावसाचा इशारा

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

...या जिल्ह्यांत राहिले ढगाळ वातावरण

सांगली, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती, कोल्हापूर, रत्नागिरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com