
Baramati News: महाराष्ट्रातील विजेचे दर हे देशात सर्वाधिक आहेत, अशी वस्तुस्थिती असताना महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियमक आयोगाकडे पुन्हा दरवाढ मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. संभाव्य दरवाढ औद्योगिक ग्राहकांसह सर्वांवर अन्यायकारक असलेले दरवाढीचा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा, अशी आक्रमक मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली.
वीज दरवाढ प्रस्तावाला विरोध करून त्याबाबतचे शासनाला निवेदन देण्यासाठी महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांना ऊर्जा भवन येथे नुकतेच निवेदन दिले. यावेळी बारामती असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह रोख वकील, सदस्य महादेव गायकवाड,
राजन नायर, उद्योजक राजेंद्र पवार, विजय झांबरे, नितीन जामदार, कैलास बरडकर, दीपक नवले, अरुण चतुर, नारायण झगडे, अशोक चणवे, रूपेश भोंगळे, महावीर कुंभारकर, अविनाश सावंत, सुशील कुमार सिंग, मुर्तुजा कोलंबोवाला, माधव खांडेकर, कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश जमाले उपस्थित होते.
श्री. जामदार म्हणाले, की महावितरणने वीजचोरी, गळती, ट्रान्समिशन लॉसेस, विद्युत निर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता, खासगी कंपन्यांकडून वीज खरेदीचे दर, प्रशासकीय खर्च या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून कार्यक्षमता वाढवून आर्थिक शिस्त आणणे गरजेचे आहे. अशा उपाययोजना केल्यास वारंवार वीज दरवाढ करावी लागणार नाही, असे आमचे ठाम मत आहे.
संभाव्य वीजदर वाढीबाबत बारामती इंडस्ट्रिअल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून बारामतीतील उद्योगक्षेत्राचा अभिप्राय व निवेदन शासनास सत्वर पाठवण्यात येईल, असे महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.
‘दरवाढीत अनेक बाबी चिंताजनक’
श्री. जानदार म्हणाले, की आताच्या प्रस्तावित दरवाढीमध्ये अनेक बाबी चिंताजनक आहेत. ज्यामध्ये स्थिर आकार, वीजदर, व्हिलिंग चार्जेस, ग्रीड सपोर्ट चार्जेस, ग्रीन टॅरिफ चार्जेस, फ्युएल अॅडजस्टमेंट चार्जेसमध्ये दरवाढ प्रस्तावित केली आहे. एलटी उद्योगांना पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्हचा लाभ आता मिळणार नाही. रूफ टॉप सोलर वापरणाच्या वीज ग्राहकांना लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह आता मिळणार नाही, त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता नवीन धोरणाचा चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.