
Farmer Pending Bills: शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळणार का हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे, असं म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी थकीत बिलावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडे बोट दाखवलं आहे. कृषिमंत्री शनिवारी (ता.२२) कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु निवडणुकीच्या नंतर काही शेतकऱ्यांना थकीत बिल पाठवण्यात आलं असून तातडीने वीज बिल भरण्याची तंबी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वीज बिलावरून संभ्रम निर्माण झाला आहे. याबद्दल राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना कृषिमंत्र्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं.
विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवली. या योजनेतून ७.५ एचपीच्या कृषीपंपासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. राज्यात ४६ लाख ७.५ एचपी कृषीपंपधारक शेतकरी असल्याने त्यासाठी १४ हजार ७६१ कोटी रुपयांचा बोजा राज्य सरकारवर पडला.
त्यावरून महायुती सरकारने निवडणुकीच्या रणांगणात शेखी मिरवली. परंतु निवडणुकी होताच शेतकऱ्यांना थकीत बिल मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यात कृषीपंपासाठी दिवसा वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु सध्या राज्यात रात्री कृषी पंपासाठी वीज दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री बेरात्री शेतात जावं लागतं. त्यामुळे शेतकरी दिवसा वीज द्या, अशी मागणी करत आहेत.
परंतु राज्य सरकारने त्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोफत विजेचं घोडं दामटवून शेतकऱ्यांची बोळवण गेली. आता मात्र शेतकऱ्यांना वीज पाठवली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारने फसवणूक केल्याची भावना आहेत.
दरम्यान, अद्याप राज्यातील किती शेतकऱ्यांना थकीत बिल पाठवण्यात आले आहेत, याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणविसांकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र गोची झाली आहे. मात्र महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र अशाप्रकारे शेतकऱ्यांना थकीत बिल पाठवले जात नसल्याचा दावा करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.