
Amravati News : बांगलादेशने आयात शुल्कात केलेल्या वाढीच्या परिणामी निर्यात प्रभावित होत देशाअंतर्गत संत्र्याचे दर गडगडले. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्यांच्याऐवजी निर्यातदार व्यापाऱ्यांचे हित जपत अनुदानापोटी १७० कोटी त्यांच्या घशात घालण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र बागायतदारांसह महाऑरेंजने या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यानंतर याला ब्रेक लागत आता हे अनुदान ५५ हजार संत्रा बागायतदारांना दिले जाणार आहे.
राज्यात सुमारे १ लाख २५ हजार हेक्टर तर एकट्या विदर्भात सुमारे १ लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. आंबिया आणि मृग बहार मिळून राज्यात सुमारे दहा लाख टन तर विदर्भात सुमारे सात लाख टन उत्पादन होते.
विदर्भात उत्पादित सात लाख टनांपैकी दीड ते दोन लाख टन संत्रा फळांची निर्यात बांगलादेशला केली जाते. निर्यातीमुळे देशाअंतर्गत बाजारात दर टिकून राहतात. असे असताना बांगलादेशने संत्रा फळाच्या आयात शुल्कात वाढीचे धोरण राबविले आहे.
सध्या हे आयात शुल्क १०१ टका बांगलादेशी चलन, ७२.०९ रुपये भारतीय चलन इतके वाढविण्यात आले आहे. तत्कालीन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी १८ जानेवारी २०२४ रोजी मात्र १७० कोटींचे अनुदान निर्यातदार व्यापाऱ्यांना देण्याचा शासन आदेश काढला.
या आदेशानुसार व्यापाऱ्यांना स्थानिकस्तरावर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यास सांगण्यात आले. अमरावती विभागात ५० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.