Nirdhar Parivartan : सामान्य जनता परिवर्तन घडवणार : तुपकर

Ravikant Tupkar : गाव, वाडीवस्तीवर सर्वसामान्यांचा प्रतिसाद मोठा आहे. ही जनता परिवर्तन घडवेल, हे निश्‍चित दिसून येत आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Agrowon

Buldhana News : शेतकरी विविध समस्यांमध्ये पिचला आहे. शेतीमालाला भाव नाही. त्याच्या प्रश्‍नांसाठी कोणी बोलायला तयार नाही. ‘निर्धार परिवर्तन’ यात्रेच्या माध्यमातून गाव खेड्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत जात असताना गाव, वाडीवस्तीवर सर्वसामान्यांचा प्रतिसाद मोठा आहे. ही जनता परिवर्तन घडवेल, हे निश्‍चित दिसून येत आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले.

चिखली तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान ते बोलत होते. तुपकर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावोगावी भेटी देऊन शेतकरी, नागरिकांसमवेत संवाद साधत आहेत. त्यांची ही निर्धार परिवर्तन यात्रा घाटावर पोहोचली आहे.

Ravikant Tupkar
Soil Health : जमिनीचे आरोग्य जपल्याशिवाय उत्पादन खर्चात बचत शक्य नाही

चिखली तालुक्यातील माळशेंबा, साकेगाव, खोर, भोकर, पळसखेड दौलत, गोद्री, चांदई, मुंगसरी, खैरव, अंबाशी, उत्रादा या गावांमध्ये यात्रा पोहोचली. या गावांमध्ये त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली.

Ravikant Tupkar
Soil Nutrient Index : मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांक

निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने जिल्हाभर फिरत असताना वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या समस्या प्रकर्षाने समोर आल्या. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित तरुण, बचत गटाच्या महिला, सर्वसामान्य मध्यमवर्गीय, व्यापारी, व्यावसायिक अशा सर्वांनाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, हे दिसून आले.

या वेळी भगवानराव मोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, राम अंभोरे, अमोल मोरे, संतोष शेळके, गजानन कुटे, अरुण पन्हाळकर, अरुण नेमाने, विठ्ठल शेळके, नीलेश धोंडगे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com