Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी?

Maharashtra Politics : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र आता हा मुहूर्तही हुकला असून, शनिवारचा (ता. १४) मुहूर्त निश्चित केल्याचे समजते.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र आता हा मुहूर्तही हुकला असून, शनिवारचा (ता. १४) मुहूर्त निश्चित केल्याचे समजते. मंत्रिमंडळात वर्णी लागेल या आशेवर मुंबईत तळ ठोकलेल्या आमदारांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेटिंगवर ठेवल्याने त्यांची घालमेल वाढली आहे.

महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्याने मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा आहे. भाजपमध्ये दोन आणि तीन वेळा निवडून आलेल्या आमदारांची संख्या ४० च्यावर आहे. त्यामुळे ज्येष्ठत्वाचा दाखला देत या आमदारांनी मंत्रिपदावर दावा ठोकला आहे. मात्र खुलेआम बोलण्याची या आमदारांना मुभा नाही.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : महायुतीच्या गोंधळात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

त्यामुळे खासगीत या आमदारांची अस्वस्थता बाहेर पडत आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना आणि दोन वेळा मंत्री असलेल्या नेत्यांनाही आपल्या पदरात काय पडणार याची चिंता लागली आहे. भाजपच्या काही मोठ्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचीही चर्चा आहे. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक संख्या असल्याने आमदारांना फारसे विचारले जात नाही.

विशेष अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण, सरकारवरील विश्वास प्रस्ताव आणि अन्य तांत्रिक बाबींवेळी या आमदारांना एकही फोन गेला नाही, असे एका भाजपच्या आमदाराने सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला स्थान द्यावे, अशी मागणी करण्यास कोणी धजावत नाही.

Maharashtra Politics
Maharashtra Political News : सत्ताधारी आमदारांचा शपथविधी, विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार; ईव्हीएमच्या मुद्द्यावर सभात्याग

यादीवर भाजप फिरविणार हात

महायुती सरकार बहुमतात असल्याने मंत्रिमंडळात वादग्रस्त चेहरे नकोत असा आग्रह भाजपचा आहे. निकाल लागल्यानंतर तब्बल १३ दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाल्याने भाजपमध्ये सर्व काही दिल्लीहून ठरत असल्याचे समोर आले आहे. सध्या शिवसेनेला १२ ते १३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० ते ११ मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे.

यामध्ये काही राज्यमंत्र्यांचा समावेश असल्याने मागील मंत्रिमंडळात असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांत अस्वस्थता आहे. शिंदे गटातील तीन ते चार चेहरे मागील सरकारमध्ये वादग्रस्त होते. त्यामुळे त्यांचा समावेश केल्यास भाजप बदनाम होईल, त्यामुळे ते नकोत असा मतप्रवाह आहे. मागील सरकारमध्ये शिंदे यांना आमदारांना एकत्र बांधून ठेवण्याची कसरत करावी लागत होती. त्यामुळे मागण्यांपासून हट्टापर्यंत सर्व काही पुरविण्यात आले होते. आता मात्र, प्रचंड बहुमत असल्याने या फारसे लाड पुरविले जाणार नाहीत. शिंदे हे निकालापासून आमदारांना भेटलेले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com