Water Bill : शासकीय पाणीपट्टी विरोधात कोल्हापुरात १३ मे रोजी महामेळावा

Mahamelava on Water Bill : राज्य शासनाने सहकारी पाणीपुरवठा संस्थांवर लादलेल्या दहापट शासकीय पाणीपट्टीच्या विरोधात सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या वतीने कोल्हापूर येथे १३ मे ला सकाळी ११ वाजता महामेळावा घेत आहोत.
Water Bill  Mahamelava
Water Bill MahamelavaAgrowon

Islampur News : राज्य शासनाने सहकारी पाणीपुरवठा संस्थांवर लादलेल्या दहापट शासकीय पाणीपट्टीच्या विरोधात सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या वतीने कोल्हापूर येथे १३ मे ला सकाळी ११ वाजता महामेळावा घेत आहोत. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

पेठ (ता. वाळवा) येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने शासकीय पाणीपट्टी दरवाढ व कृषी पंपांना जलमापक यंत्र बसविण्याच्या सक्तीच्या विरोधात गुरुवारी (ता. ११) आयोजित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

Water Bill  Mahamelava
Water Bill : थकित पाणीपट्टीचा बोजा सात-बारावर नोंद होणार

आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाटगे, राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्कप्रमुख आर. जी. तांबे, जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष जे. पी. लाड, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘राज्य शासन टेंभू, म्हैसाळ, ताकारी यांसारख्या मोठ्या शासकीय योजनांचे ८१ टक्के वीज बिल भरते. त्याप्रमाणे त्यांनी सहकारी पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल भरावे. राज्य शासनाने तातडीने अन्यायी १० पट शासकीय पाणीपट्टी दरवाढ व जलमापक यंत्र बसविण्याची सक्ती मागे घ्यावी. आमचा शेतकरी ११२० रुपये व २० टक्के स्थानिक कराप्रमाणे हेक्टरी रुपये १३४६ पाणीपट्टी भरत आहे. शासनाने हाच दर पुढील ५ वर्षे कायम ठेवावा.’

Water Bill  Mahamelava
Water Bill Recovery : ऊस बिलातून पाणीपट्टीची कपात होणार नाही

अरुण लाड म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर कर्जे काढून सहकारी पाणीपुरवठा योजना उभा केल्या आहेत. त्यांना वीजबिल व शासकीय पाणीपट्टीमध्ये सवलत देण्याऐवजी शासन अन्यायी शासकीय पाणीपट्टी लादत आहेत. ते आम्ही खपवून घेणार नाही.’

या वेळी विजयराव पाटील, रवींद्र बर्डे, सह्याद्रीचे संचालक बाबासो मोरे, पुणे जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे दिलीप जगताप, विजयकुमार सूर्यवंशी, शरद देशपांडे, विजयकुमार चव्हाण, महेश पाटील यांची भाषणे झाली. या वेळी पाच जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com