MahaDBT : ‘महाडीबीटी’वरील प्रलंबित अर्जांची होणार निवड

Agriculture Scheme : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अनुदान मिळावे म्हणून महाडीबीटीवर सुरू केलेली सोडत पद्धत बंद केली आहे.
MahaDBT
MahaDBTAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अनुदान मिळावे म्हणून महाडीबीटीवर सुरू केलेली सोडत पद्धत बंद केली आहे. महाडीबीटीवर अर्ज करूनही निवड होत नसल्याने अनुदानाचा आधार घेऊन शेतात सोनं पिकविण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न लांबणीवर पडले.

मात्र, कृषी विभागाने अर्ज निवड प्रक्रियेची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही नवी पद्धत लागू केली असून त्याअंतर्गत प्रलंबित अर्जांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार ७३१ अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MahaDBT
DBT Fraud: डीबीटीला स्मार्ट वळसा; महाराष्ट्रातील कृषी घोटाळ्याचा नवा अध्याय उघड!

सोडत पद्धत बंद करून आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने अर्जदार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जांचे काय होणार, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, शासनाने या शेतकऱ्यांना दिलासा देत नवीन निवड पद्धतीत प्रलंबित राहिलेल्या अर्जांना प्राधान्य देण्यात येईल, असा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.\

कृषी योजनेतून अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर शेतकरी अर्ज करतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी योजनांच्या लाभासाठी तब्बल ४ लाख १६ हजार ७३१ अर्ज केलेले आहेत. त्यात केवळ ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या २ लाख ३२ हजार अर्जांचा समावेश आहे.

MahaDBT
DBT for Farmer: आयुक्त, आदेश अन् अंमलबजावणी

सोडत बंद केल्याने शेतकऱ्यांना कृषी अवजारे, पाइपलाइन, फळबाग लागवड, कांदा चाळ, ठिबक सिंचन आदी काहीच घेता आलेले नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला वर्भभरापासून खीळ बसली आहे. प्रथम प्राधान्य या पद्धतीत प्रलंबित अर्जांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने उशिरा का होईना या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) काढणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शेतकऱ्याकडे शेतकरी ओळख क्रमांक नसेल, तर या शेतकऱ्यास अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

तारखेनुसार होणार प्रलंबित अर्जांची निवड

समजा एखाद्या शेतकऱ्याने ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी १० ऑगस्ट २०२४, तर दुसऱ्याने ११ ऑगस्टला अर्ज केलेला आहे. यामधून १० ऑगस्टला अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची अनुदानासाठी निवड केली जाईल. अर्जाच्या तारखेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रमाणे प्रलंबित अर्जांची निवड होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com