Mahabeej Seed : महाबीजकडून रब्बीसाठी ५६ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

Rabi Sowing : परभणी जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस या पिकांच्या ८ हजार ६०१ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस, मोहरी या पिकांच्या ४ हजार ६२५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला.
Rabi Seed
Rabi SeedAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस, मोहरी या पिकांचा मिळून एकूण ५६ हजार ७६८ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

Rabi Seed
Sangli Rabi Sowing : सांगलीत रब्बी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता

कृषीच्या मागणीनुसार बियाणे पुरवठा केला जातो. त्यानुसार यंदाच्या रब्बी हंगामात विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये आजवर हरभऱ्याच्या ४१ हजार ५५७ क्विंटल, ज्वारीच्या ११ हजार ४५३ क्विंटल, गव्हाच्या २ हजार ५९८ क्विंटल, करडईच्या १ हजार १३५ क्विंटल, जवसाच्या २० क्विंटल, मोहरीच्या ५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

Rabi Seed
Rabi Sowing : पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात

परभणी जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस या पिकांच्या ८ हजार ६०१ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस, मोहरी या पिकांच्या ४ हजार ६२५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू, करडई या पिकांच्या १२ हजार क्विंटल, लातूर जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस या पिकांच्या ११ हजार क्विंटल बियाण्याचा, धाराशीव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस या पिकांच्या ९ हजार ७१३ क्विंटल तर सोलापूरात हरभरा, ज्वारी, गहू, करडई या पिकांच्या ८ हजार ९४१ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com