Kanifnath Yatra: मढीतील कानिफनाथ यात्रेस मानाच्या होळीने सुरुवात!

Madhi Festival: मढी (ता. पाथर्डी) येथे कानिफनाथ महाराज संजीवन समाधी यात्रेस मानाची होळी पेटवून सुरुवात झाली. या ऐतिहासिक यात्रेत धार्मिक विधींसह प्रसिद्ध गाढव बाजार भरतो.
Holi Festival
Holi FestivalAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: श्री कानिफनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा यात्रेला मढी (ता. पाथर्डी) येथे शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी मानाची होळी पेटवून सुरुवात झाली. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले उपस्थित होते. यानंतर महिनाभर ही यात्रा सुरू राहणार असून, यात्रेत विविध कार्यक्रम होणार आहेत. येथील गाढवाचा बाजारही देशातील एक प्रमुख बाजार आहे.

नवनाथाचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेल्या गर्भगिरी डोंगररांगेत मढी (ता. पाथर्डी) येथे नवनाथापैकी एक असलेल्या कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे, तर येथून जवळच दहा किलोमीटर अंतरावर सावरगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथे मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. मढीत दर वर्षी होळीपासून यात्रेला सुरुवात होते. ७०० वर्षांपासून ही यात्रेची परंपरा आहे. यात्रेतील गाढवांचा बाजारही प्रसिद्ध आहे.

Holi Festival
Sawai Sarja Veer Yatra: वीरमध्ये ‘सवाई सर्जाचा’ जयघोष! श्रीनाथ म्हस्कोबा-जोगेश्वरी विवाह सोहळ्याची शाही मिरवणूक

दरम्यान, होळीच्या सणापूर्वी १५ दिवस अगोदरच होळी साजरी करणारे मढी राज्यातील पहिलेच गाव आहे. होळी पेटविल्यानंतर मढी यात्रेला प्रारंभ झाल्याचे भाविक मानतात. शुक्रवारी (ता. २८) रात्री कानिफनाथांची भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात येऊन भट्टीची पूजा करण्यात आली.

Holi Festival
Siddheshwar Yatra : यंदा पिकांसह पाऊसपाणी मुबलक ; सिध्देश्वर यात्रेत भाकणूक

सूर्यास्त होण्यापूर्वी होळी रचून ती पेटवण्यात आली. मढी गावातील, तसेच परिसरातील ग्रामस्थांनी शेणाच्या गोवऱ्या, तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. या वेळी होळीभोवती आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. आता चार मार्चला श्री कानिफनाथ महाराज समाधीला तेल लावले जाणार असून ९ मार्चला कळस चढवणे तसेच कैकाडी व गोपाळ समाजाची मानाची होळी असेल.

१९ मार्चला रंगपंचमीला नाथ समाधी दिन सोहळा, २५ ते २८ मार्चला मुक्तदार समाधी दर्शन, २९ मार्चला फुलबाग यात्रा व ३० मार्चला गुढीपाडव्याला महाभिषेक व महापूजा उत्सव होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com