Sawai Sarja Veer Yatra: वीरमध्ये ‘सवाई सर्जाचा’ जयघोष! श्रीनाथ म्हस्कोबा-जोगेश्वरी विवाह सोहळ्याची शाही मिरवणूक

Mhaskoba Jogeshwari Wedding Event: श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे माघ पौर्णिमेनिमित्त ‘सवाई सर्जाचा’ जयघोष करत श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. लाखो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा भव्य मिरवणुकीसह पारंपरिक विधींनी संपन्न झाला.
Sawai Sarja Veer Festival
Sawai Sarja Veer FestivalAgrowon
Published on
Updated on

Purandar News: श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘सवाई सर्जाचा’ जयघोष करत श्रीनाथ म्हस्कोबांचा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा शाही थाटात पार पडला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

मानाच्या पालख्या व वस्त्र परिधान केलेल्या काठ्यांची पारंपरिक भेट झाली या वर्षी तेरा दिवस चालणाऱ्या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, रंगिबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. देवाचा लग्नसोहळा पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वीर येथे दाखल झाले असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले.

Sawai Sarja Veer Festival
Watershed yatra: केंद्रीय कृषिमंत्री चौहानांनी केला 'वॉटरशेड' यात्रेचा शुभारंभ

म़ंगळवारी (दि. ११) संध्याकाळी राऊतवाडी येथे मानाच्या कोडीत येथील पालखीने हळदीचा मान स्वीकारला. संध्याकाळी सात वाजता श्री क्षेत्र वीर येथील वेशीवर पालखीचे आगमन झाले. त्या वेळी वीर मंडळींच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

Sawai Sarja Veer Festival
Siddheshwar Yatra : ‘सिद्धेश्‍वर महाराज की जय’च्या गजरात योगदंडाची पूजा

देऊळवाड्याच्या दक्षिण दरवाजाने सर्व मानाच्या काठ्या आणि कोडीतची पालखी देऊळवाड्यात गेली दोन मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री बाराच्या दरम्यान मानकरी राऊत मंडळींनी देवाला पोशाख, मंडवळ्या, बाशिंग, अलंकार करून एक वाजता ‘सवाई सर्जाचा’ जयघोष करत सर्व देवांना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले.

रात्री दीड वाजता देवस्थानच्या पालखीमध्ये उत्सव मूर्तींचे मुखवटे ठेवून पालखी दक्षिण दरवाजाने बाहेर पडली कोडीत बरोबर राजेवाडी, भोडवेवाडी, सोनवडी, पुणे (कसबा पेठ), कनेरी, सुपे, आदी पालख्या व वस्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्या रात्री दोन वाजता देऊळवाड्यात दाखल झाल्या. मध्यरात्री अडीच वाजता श्री नाथ मस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com