Illegal Mineral Mining : अवैध गौण खनिजननाकडे दुर्लक्ष भोवले; तहसीलदार रणवरे निलंबित

Minor Mineral Transport : माढा तालुक्यातील उजनी धरण कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पण त्याकडे तहसीलदार रणवरे यांनी दुर्लक्ष केले.
Illegal Mining
Illegal Mining Agrowon
Published on
Updated on

Solapur News : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई न करणे, तसेच गौण खनिज विषयक बाबींकडे दुर्लक्ष करणे माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना चांगलेच भोवले असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

माढा तालुक्यातील उजनी धरण कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पण त्याकडे तहसीलदार रणवरे यांनी दुर्लक्ष केले. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने १३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रान्वये त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून तहसीलदार रणवरे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केलेला होता.

Illegal Mining
Illegal Sand Mining : अवैध वाळूउपशा विरोधात ‘महसूल’ची कारवाई जोरात

या प्रकरणी शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ एप्रिल २०२५ च्या आदेशान्वये तहसीलदार रणवरे यांनी कार्यालय प्रमुख या नात्याने कामकाजावर नियंत्रण ठेवले नसलेचे आणि कार्यालयीन तपासणीतील बाबींबाबत संधी देऊनही सुधारणा केली नाही. तसेच अवैध गौण खनिज प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई केली नाही,

Illegal Mining
Illegal Mining Bauxite : कोल्हापुरात बेकायदेशीरपणे बॉक्साईटचे उत्खनन, पर्यावरणाची मोठी हाणी

खाणपट्टा मंजुरीच्या अनुषंगाने मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतर ही वरिष्ठ कार्यालयास सादर केला नाही, तसेच कार्यालयाच्या तपासणीनंतर शतकपूर्तीवेळी सदरच्या बाबी निदर्शनास आलेल्या असतानाही रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्यामुळे त्यांना आता शासनाने निलंबित केले आहे.

माढा तालुक्यातील अवैध वाळू उपशावर नियंत्रण न ठेवणे व अन्य प्रशासकीय बाबीतील अनियमिततेमुळे तहसीलदार रणवरे यांना निलंबित केले आहे. यापुढेही अवैध वाळू उपशावर नियंत्रण न ठेवणे तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितावर अशीच कठोर कारवाई करण्यात येईल.
-कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com