Illegal Sand Mining : अवैध वाळूउपशा विरोधात ‘महसूल’ची कारवाई जोरात

Sand Mining Update : बुलडाणा जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचा धुमाकळू सुरू आहे. याविरुद्ध उशिराने का होईना आता महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.
Sand Mining
Sand MiningAgrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचा धुमाकळू सुरू आहे. याविरुद्ध उशिराने का होईना आता महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे तीन हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू पकडून जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. वाळूच्या अवैध उपशाविरुद्ध नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई हातात घेतली.

जिल्ह्यात सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यात आली. दोन दिवसांत केलेल्या विविध कारवाईत तब्बल २२०० ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. जप्त केलेली वाळू शासकीय कामे, तसेच घरकुल किंवा अन्य कामांसाठी आवश्यक असलेल्यांना जागीच लिलाव करून देण्यात आली.

Sand Mining
Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

महसूल विभागाने गेल्या दोन दिवसांत केलेल्या कारवाईत डिग्रस बुद्रुक येथील ५०० ब्रास, निमगाव वायाळ येथे १००० ब्रास आणि नारायणखेड येथे ७०० ब्रास अशी एकूण २२०० ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली. जप्त वाळू त्याच ठिकाणी लिलाव करून संबंधितांच्या ताब्यात देण्यात आली. ही वाळू तीन दिवसांच्या आत उचलण्याची निर्देशही देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, महसूल प्रशासन, परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी संयुक्त मोहिमेदरम्यान वाहनांवर कारवाई करण्यात केली. यात १२ टिप्पर, दोन ट्रॅक्टर, एक कार आणि चार इतर वाहने अशा एकूण १९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे दोन लाख १८ हजारांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. कारवाईत सहायक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेघ यांनी सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी चिंचखेड येथील खडकपुर्णा धरणाला भेट दिली.

Sand Mining
Illegal Sand Mining : सोलापूर जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा सुरू

पुन्हा ७०० ब्रास वाळू जप्त

जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई सुरूच आहे. यात संग्रामपूर आणि सिंदखेडराजा तालुक्यात कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७०० ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली असून मेहकर, लोणार येथे १४ टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी नारायणखेड येथे अवैध साठा केलेली ४०० ब्रास वाळू आढळून आली. महसूल विभागाने ही वाळू जप्त करून कारवाई केली. तसेच खिरोडा (ता. संग्रामपूर) येथे ३०० ब्रास वाळूचा साठा निदर्शनास आला. या ठिकाणीही वाळू जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

विना नंबरप्लेट १४ टिप्पर वाहनांवर कारवाई

शुक्रवारी (ता. २४) विशेष मोहिमेदरम्यान मेहकर व लोणार तालुक्यामध्ये विना नंबरप्लेट १४ टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे १ लाख ३३ हजार ५०० रुपये एकूण दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. परिवहन विभागाचे सहायक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेघ यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी, मंडळ अधिकारी त्यांच्या सहकार्याने गावांमध्ये करण्यात येणाऱ्या अवैध वाळूसाठाची माहिती घेऊन कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com