Amla Processing Machines : आवळा मूल्यवर्धनासाठी यंत्रे

Equipment for Processing : आवळा फळांपासून तयार केलेल्या विविध मूल्यवर्धित पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. आवळ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात.
Amla Processing Machines
Amla Processing MachinesAgrowon
Published on
Updated on

कृष्णा काळे, सर्वदा भांड

Amla (Indian gooseberry) Value-added products : आवळा फळांपासून तयार केलेल्या विविध मूल्यवर्धित पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. आवळ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात. प्रत्येक यंत्राचे कार्य हे वेगळे असून त्याविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

फळाचा लगदा वेगळे करण्याचे यंत्र (पल्पर)

आवळा फळातील तंतुमय पदार्थ (फायबर) आणि वरील आवरण वेगळे करून लगदा काढण्यासाठी हे यंत्र वापरले जाते.

उत्पादनाची गुणवत्ता ही आवळा फळाचा प्रकार आणि आकार यावर अवलंबून असते.

या यंत्राच्या क्षमतेनुसार प्रति तास ५०० ते ५००० किलो इतका लगदा (पल्प) तयार करता येतो.

यामध्ये साधारणपणे ७.५ एचपी क्षमतेची विद्यूत मोटार वापरण्यात येते.

बाजारामध्ये ५० हजार रुपयांपासून पुढे श्रेणी व क्षमतेनुसार हे यंत्र उपलब्ध आहे.

रस काढण्याचे यंत्र

मानक ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून या यंत्राची निर्मिती करण्यात येते.

या यंत्राचा वापर आवळा प्रक्रिया उद्योगासह अन्य फळांचा रस काढण्यासाठी देखील केला जातो.

या मशिनमध्ये कच्चा माल (आवळा फळ) हॉपरमध्ये टाकून त्यावर स्क्रूच्या मदतीने दबाव टाकला जातो. त्यातून निघणारा रस गाळण यंत्रणेतून तळाशी असलेल्या भांड्यामध्ये वेगळा होतो.

Amla Processing Machines
Amla Processing : आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

या यंत्राच्या साह्याने प्रति तास २०० ते २५० किलो इतका रस तयार होतो.

यात ३ एचपी क्षमतेची मोटार वापरलेली असून, २२० ते २४० व्होल्ट इतकी ऊर्जा आवश्यक असते.

या यंत्राची किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे.

रस काढण्याचे यंत्र (हायड्रॉलिक प्रेस)

हायड्रॉलिक प्रेस या यंत्राचा उपयोग आवळा फळापासून रस काढण्यासाठी केला जातो.

फळातून रस काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या आवळ्याचा वापर कॅण्डी बनविण्यासाठी केला जातो.

हायड्रोलिक प्रेस मशिन पास्कलच्या नियमाने कार्य करते. हायड्रॉलिक प्रेस मशिन पंपच्या साहाय्याने आवळा फळावर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत समान दाब तयार करते. त्यातून बाहेर येणारा रस गाळण यंत्रणेतून तळाशी असलेल्या भांड्यामध्ये काढला जातो.

या यंत्राने प्रति २ मिनिटांना सुमारे १० किलो रस काढता येतो. तसेच स्वयंचलित प्रकारात २० ते ४० टन, अर्ध स्वयंचलित व मानवी पद्धतीने काम करणारी यंत्रे विविध श्रेणीमध्ये (क्षमतेनुसार १ किलोपासून १०० किलोपर्यंत) उपलब्ध आहेत.

उत्पादनाच्या वैशिष्ट्यांनुसार या यंत्राची किंमत २० हजारपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत आहे.

Amla Processing Machines
Amla Food Processing : आवळ्यापासून चूर्ण, लोणचे, सुपारी

रस बाष्पीभवन करण्याचे यंत्र

स्टीम जॅकेटेड कॅटल किंवा बाष्पीभवन पॅन हे एक बाष्पीभवन करणारे यंत्र आहे. विविध प्रक्रिया उद्योगामध्ये या किटल्यांचा वापर केला जातो.

आवळा रस निर्मितीमध्ये यात रसाला एकसमान उष्णता देण्यासाठी वाफेचा वापर केला जातो.

या किटलीचा आकार ५ ते २०० गॅलनपर्यंत असतो.

या यंत्राची किंमत ४७ हजार रुपयांपासून पुढे क्षमतेनुसार वाढत जातात.

रस साठवण टाकी

प्रक्रियायुक्त आवळा रस किंवा लगदा पदार्थ साठवण्यासाठी व त्यांचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी साठवण टाकीचा वापर केला जातो.

ही टाकी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते.

साठवण टाकीचे उभे आणि आडवे असे दोन प्रकार आहेत. उभ्या प्रकारापेक्षा

यंत्राच्या आडव्या प्रकारामध्ये जास्त जागा लागते.

साठवण टाकीची क्षमता ५०० लिटरपासून पुढे असून यंत्राला आतमध्ये एक एजिटेटर (फिरणारा पंखा) जोडलेला असतो.

यंत्राला जोडण्यात आलेल्या कंट्रोल पॅनेल द्वारे तापमान नियंत्रित करता येते.

साध्या टाकीपेक्षा या साठवण टाकीत साठवलेल्या रसाची टिकवण क्षमता अधिक असते.

ही टाकी प्रत्येकवेळी वापर करण्यापूर्वी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेणे गरजेचेअसते.

साठवण टाकी ही अर्ध-स्वयंचलित आहे.

या टाकीची किंमत ३५ हजारांपासून पुढे आहेत.

वाळवण यंत्र

आवळा फळामधून ओलावा काढून ते वाळविण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो.

आवळा फळे सामान्यतः ५० अंश सेल्सिअस, ६० अंश सेल्सिअस आणि ७० अंश सेल्सिअस तापमानावर वाळविली जातात. उदा. ५० अंश सेल्सिअस तापमानावर वाळविलेल्या आवळा फळाचे अंतिम वजन १२.९६ ग्रॅम असते. तर ६० अंश सेल्सिअस तापमानावर १२.९२ ग्रॅम आणि ७० अंश सेल्सिअस तापमानात १२.९० ग्रॅम असते.

या यंत्राच्या मदतीने प्रत्येक बॅचमध्ये ६० ते २४० किलो आवळा फळे वाळविता येतात. त्यासाठी प्रत्येक तासाला १० ते ३६ किलो स्टीम (वाफ) वापरली जाते.

हे उपकरण ७५ हजार या किमतीत बाजारात उपलब्ध आहे.

पॅकेजिंग यंत्र

आवळ्याच्या विविध प्रक्रिया उत्पादनाच्या पॅकेजिंगसाठी सीलिंग मशिन, फिलिंग मशिन, स्ट्रेपिंग मशिन, रॅपिंग मशिन, कोडिंग मशिन आणि लेबलिंग मशिन इ. पॅकेजिंग यंत्राचा वापर केला जातो.

प्रति तास ५०० किलोपर्यंत प्रक्रियायुक्त पदार्थ पॅक करण्याची क्षमता.

यंत्राची उंची ३.५० फूट व लांबी १.५० फूट आहे.

हे यंत्र बाजारात ६० हजार रुपयांपासून उपलब्ध आहे.

यामध्ये छोट्या प्रकारात सिलिंग यंत्र उपलब्ध आहे. त्यावर छोट्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांचे पॅकेजिंग करता येते. यात हिटिंग कॉइलचा वापर केलेला असतो. हे यंत्र आकाराने छोटे असून सिंगल फेजवर चालवता येते. या यंत्राचे वजन २ किलोपर्यंत असते. यामध्ये १० मिलिपासून २ किलो पर्यंतच्या पदार्थाचे पॅकेजिंग करता येते. या यंत्राची क्षमता प्रति तास ४० किलो इतकी आहे. यंत्राची किंमत १५०० रुपयांपासून सुरू होते.

- कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com