कृष्णा काळे, सर्वदा भांड
Agro Industries Manufacturing Tools : आपल्या सर्वांना परिचित असलेला तुरट चवीचा आवळा अनेक आरोग्यदायी गुणधर्मासाठी ओळखला जातो. आवळा फळांमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असते. अनेक औषधी गुणधर्म असलेल्या आवळा तुरट चवीमुळे अनेक जण खाणे टाळतात. त्यासाठी आवळ्यावर प्रक्रिया करणे उत्तम पर्याय ठरतो.
आवळ्यापासून तयार केलेल्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आवळ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध यंत्रांची आवश्यकता असते. त्यात वॉशर, पंचिंग मशिन, ब्रेकिंग मशिन, श्रेडिंग मशिन, पल्पर, ज्यूस एक्स्ट्रॅक्टर, हायड्रोलिक प्रेस मशिन, स्टीम जॅकेट केलेली किटली, स्टोअरेज टँक, ट्रे ड्रायर, पॅकेजिंग मशिन अशी विविध यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. या प्रत्येक यंत्राचे कार्य हे वेगळे असून, त्याविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
आवळा फळ टोचण्याचे यंत्र (पंचिंग मशिन)
आवळा पंचिंग हे उपकरण आवळा
फळ टोचे मारण्यासाठी वापरले जाते. टोचे मारलेल्या आवळ्याचा वापर लोणचे व कॅण्डी बनविण्यासाठी केला जातो.
या यंत्रामध्ये वरच्या बाजूने आवळा टाकला जातो. आतमध्ये लावलेल्या धारेदार खिळ्याच्या साह्याने आवळ्याला छिद्र पाडले जातात.
हे उपकरण पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचे बनवलेले असते.
या यंत्राची क्षमता प्रति तास ८० किलो आवळा इतकी आहे.
हे विजेवर चालणारे यंत्र असून यात १ एचपी क्षमतेची विद्युत मोटार जोडलेली असते.
यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागत असून, ते सिंगल फेजवर चालते.
यंत्राचे वजन साधारणपणे ४० किलो आहे.
आवळा फोडण्याचे यंत्र (ब्रेकिंग मशिन)
या उपकरणाच्या मदतीने आवळा फळे फोडण्यासाठी म्हणजे आवळा फळाचे तुकडे करण्यासाठी वापरले जाते.
फोडलेल्या आवळ्याचा वापर कॅण्डीसह अनेक पदार्थांमध्ये केला जातो.
या उपकरणाच्या मदतीने आवळ्याचे तुकडे करताना आतील बियांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
यंत्रामधून प्रति तास २०० किलो आवळा फोडला जातो.
या यंत्रामध्ये ०.५ एचपी क्षमतेची विद्युत मोटार वापरलेली आहे.
या यंत्राचे काही भाग फूड ग्रेड स्टीलपासून बनवलेले आहेत.
हे यंत्र सिंगल फेजवर चालत असून, त्यासाठी २२० व्होल्ट ऊर्जा लागते.
श्रेडिंग मशिन (बिया वेगळे करून लगदा करण्याचे यंत्र)
आवळा फोडून त्यातील बिया वेगळ्या करणे आणि त्याचा लगदा तयार करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. त्यामुळे आवळ्यातील औषधी गुणधर्म तसेच राहण्यास मदत होते.
विविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये आवळा लगद्याचा वापर केला जातो.
हे यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असल्यामुळे गंज प्रतिरोधक आहे.
या यंत्राच्या साह्याने प्रत्येक तासाला साधारणपणे २५० किलो आवळा फळांच्या बिया वेगळ्या केल्या जातात.
या यंत्राचे वजन ४० किलो आहे.
या यंत्रामध्ये अर्धा एचपी क्षमतेची विद्युत मोटर असते.
हे यंत्र थ्री फेजवर चालत असून अर्ध स्वयंचलित प्रकारातील आहे
वॉशर (आवळा स्वच्छ करण्याचे यंत्र)
हे उपकरण व्यावसायिक पातळीवर आवळा फळे स्वच्छ धुण्यासाठी वापरले जाते. यंत्रामध्ये आवळा फळे टाकल्यानंतर नोझलद्वारे पाणी फवारणी करून ती स्वच्छ केली जातात.
या यंत्राद्वारे प्रतितास ६० ते ८० किलो आवळा फळे स्वच्छ करता येतात.
हे यंत्र हे पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले आहे.
यंत्राला ०.५ एचपी विद्युत क्षमतेची मोटार जोडलेली असून यंत्र चालविण्यासाठी २४० व्होल्ट विजेची आवश्यकता असते.
यंत्राचा आकार ४ बाय २ फूट, तर वजन ९० किलो इतके असते.
कृष्णा काळे, ८८०५९६८५३६
(लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.