Rain Update : कंधार, लोह्यामध्ये सर्वात कमी पावसाची नोंद

Maharashtra Rain : नांदेड जिल्ह्यात पावसाळ्याच्या पाच महिन्यात वार्षिक सरासरीच्या ८८६.९० मिलीमीटरनुसार ९९.५१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात पावसाळ्याच्या पाच महिन्यात वार्षिक सरासरीच्या ८८६.९० मिलीमीटरनुसार ९९.५१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. असे असलेतरी हा पाऊस कंधार व लोहा तालुक्यात सर्वात कमी झाला आहे. जिल्ह्यातील सोळा पैकी ११ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.

नांदेड जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८९१.३० मिलिमीटर आहे. हा पाऊस जंगल क्षेत्र असलेल्या किनवट, माहूर तालुक्यात एक हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पडतो. मागील वर्षीही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२६ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा पावसाने वार्षिक सरासरी गाठली असलीतरी मागील दिड महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे रब्बी हंगाम मात्र धोक्यात आला आहे. तर पावसाचा खंडही पडल्याची नोंद झाली.

Rain Update
Fodder Policy : वर्षभर चाऱ्यासाठी ‘फॉडर पॉलिसी’

पावसाचे प्रमाण सरासरीच इतके दिसत असलेतरी या अनियमित पावसाचा फटका खरिपातील पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. पावसाळ्याच्या पाच महिन्यात जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या ८८६.९० मिलीमीटरनुसार ९९.५१ टक्के पावसाची नोंद झाली. हा पाऊस जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सर्वात कमी ५२०.२० मिलीमीटरनुसार ६४.८० टक्के पाऊस नोंदला. तर लोहा तालुक्यात ६८३.८० मिलीमीटरनुसार ८६.०३ टक्के नोंदला गेला.

Rain Update
Crop Nutrition : पिकांचे पोषण, वाढीसाठी सूक्ष्मजीवांचे कार्य व महत्त्व

यासोबतच हदगाव, नांदेड व हिमायतनगर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या कमी झाला. तर इतर अकरा तालुक्यात मात्र पावसाने जबरदस्त हजेरी लावत वार्षिक सरासरी ओलाढंली आहे. हा पाऊस सर्वाधीक माहूर तालुक्यात १२१०.९० मिलीमीटरनुसार ११९.०८ टक्के झाला आहे. तर त्या खालोखाल किनवट ११८५.६० मिलीमीटरनुसार ११५.४९ टक्के, बिलोली ११२२ मिलीमीटरनुसार १२३.१९ टक्के, अर्धापूर १०५२.२० मिलीमीटरनुसार १३२.५९ टक्के, भोकर १०२८ मिलीमीटरनुसार १०६.८० टक्के, धर्माबाद १०५२.२० मिलीमीटरनुसार १२५.६१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

पाच महिन्यात तालुकानिहाय झालेला पाऊस

(पाऊस मिलीमीटरमध्ये, कंसात टक्केवारी)

नांदेड ७३१.७० (८८.११), बिलोली ११२२.१९ (१२३.१९), मुखेड ८२९.१० (१०६.४४), कंधार ५२०.२० (६४.८०), लोहा ६८३.८० (८६.०३), हदगाव ८०५.७० (९१.४९), भोकर १०२८.८० (१०६.८०), देगलूर ९३७.९० (११४.२७), किनवट ११८५.६० (११५.४९), मुदखेड ८८७.९० (१०७.०८), हिमायतनगर ७२४.२० (८३.५०), माहूर १२१०.७० (११९.०८), धर्माबाद १०१२.९० (१२५.६१), उमरी ८८७.६० (१०३.५२), अर्धापूर १०५२.२० (१३२.५९), नायगाव ७७१.८० (१०६.६८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com