Jalgaon News : जिल्ह्याचे सुपुत्र असलेले अॅड. उज्ज्वल निकम व चंद्रकांत रघुनाथ उर्फ सी. आर. पाटील हे यंदा भाजपतर्फे अनुक्रमे मुंबई व नवसारी (गुजरात) येथे लोकसभेची निवडणूक लढत आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील दोन मतदार संघांतही लोकसभेचे प्रतिनिधी पाठविले जातील. अॅड. निकम व पाटील हे विजयी झाल्यास जिल्ह्यातील चार खासदार लोकसभेत प्रतिनिधित्त्व करण्यासाठी जाण्याचा योग येणार आहे.
जिल्ह्यात रावेर व जळगाव हे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. पूर्वी एरंडोल व जळगाव हे दोन लोकसभा मतदार संघ होते. परंतु मतदार संघांची पुनर्रचना झाल्यानंतर एरंडोल मतदार संघ व्यपगत झाला आणि जळगाव व रावेर हे मतदार संघ अस्तित्वात आले. या दोन्ही मतदार संघांतून जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी लोकसभेत जाणार आहेत.
परंतु जिल्ह्याचे सुपुत्र असलेले अॅड. उज्ज्वल निकम यांनाही यंदा उत्तर-मध्य मुंबई या मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. निकम हे मूळचे माचला (ता. चोपडा) येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे बंधू, पुतणे तेथे शेती करतात. पुतण्या रोहित हे जळगाव भाजपमध्ये कार्यरत आहेत. वडील देवराव निकम हे १९६२ मध्ये चोपडा विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते.
चंद्रकांत पाटील गुजरातमध्ये ताकदवान
चंद्रकांत पाटील उर्फ सी. आर. पाटील हे मूळचे पिंप्री (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील आहेत. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी स्थलांतर केले. ते गुजरात पोलिसात कर्मचारी होते. पुढे भाजपमध्ये सक्रिय झाले. गुजरात औद्योगिक विकास महामंडळ व गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदार संघातून सलग तीन वेळेस विक्रमी मताधिक्याने ते विजयी झाले आहेत. यंदाही पाटील हे नवसारीमधून भाजपचे उमेदवार आहेत. अॅड. निकम व पाटील हे विजयी झाल्यास जळगावचे चार जण लोकसभेत प्रतिनिधित्त्व करतील, असे चर्चिले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.