Pune News: ‘देशातील सोयाबीनचा पुरवठा आणि सोयापेंडचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त सोयापेंड कमी असून निर्यात आठ लाख टनांवरच स्थिरावणार आहे. त्यापैकी पाच लाख टन सोयापेंड डिसेंबरपर्यंत निर्यात झाली,’ असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) म्हटले आहे. या स्थितीचा आधार सोयाबीन दराला मिळणार असून सोयाबीन लवकरच किमान आधारभूत किमतीचा (हमीभाव) टप्पा गाठेल, असा अभ्यासकांचा अंदाज आहे..देशात यंदा १०५ लाख टन सोयाबीन उत्पादन झाल्याचा अंदाज सोपाने व्यक्त केला आहे. परंतु बाजारातील अभ्यासक आणि उद्योगातील जाणकारांच्या मते यंदाचे उत्पादन ९० ते ९५ लाख गाठींच्या दरम्यानच स्थिरावले आहे. त्यातच गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीनही कमी आहे. तसेच आयात यंदा सहा लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील सोयाबीनचा पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे देशात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली आहे..Soybean MSP Registration: सोयाबीन नोंदणीला एक महिना मुदतवाढ.ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातील बाजारात ४३ लाख टन सोयाबीनची आवक झाली, असे सोपाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीपेक्षा आवक तीन लाख टनांनी कमी आहे. गेल्या वर्षीही गाळपाचे प्रमाण असेच होते. सोयापेंड निर्मितीही गेल्या वर्षीच्या जवळपास म्हणजेच २४ लाख टन इतकी झाली..सोयापेंडला मागणीदेशातील सोयापेंडचा पुरवठा यंदा गेल्या वर्षीपेक्षा १४ लाख टनांनी कमी होऊन ७७ लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यापैकी यंदा ७६ लाख टनांचा वापर होणार आहे. देशातच ६८ लाख टन वापर आणि निर्यात आठ लाख टन होण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात १५ लाख ५० हजार टन सोयापेंडचा देशात वापर झाला आहे. यंदाचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कमी आहे, असे सोपाने म्हटले आहे. डीडीजीएसचा भाव कमी असतानाही यंदा सोयापेंडचा वापर पोल्ट्रीमध्ये वाढत असल्याचे दिसते, असे प्रक्रियादारांनी सांगितले..Soybean MSP: सोयाबीनची हमीभाव खरेदी ठरतेय मृगजळ.हमीभाव खरेदी मंदावलीराज्यात आतापर्यंत हमीभावाने ५ लाख ८८ हजार टन सोयाबीन खरेदी करण्यात आले. राज्यातील ६ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी केवळ २ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. आता खुल्या बाजारातही सोयाबीनचे भाव वाढत असल्याने हमीभावाने खरेदी मंदावली आहे..दरवाढीला आधारसध्या बाजारात सोयाबीन प्रति क्विंटल ४ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ३५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र दरात काहीसे चढ-उतारही दिसतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..सोयापेंड निर्यात घटणार?देशातून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सोयापेंडची निर्यात ५ लाख ७ हजार टन झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यात केवळ ११ हजार टनांनी कमी होती. भारतातून फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅंड, नेपाळ, बांगलादेश, जपान, यूएई, इराणला सोयापेंड निर्यात मोठ्या प्रमाणावर झाली. त्यातही फ्रान्सला सर्वाधिक ८१ हजार टन निर्यात झाली. देशातून यंदा एकूण आठ लाख टन सोयापेंड निर्यातीची शक्यता आहे. गेल्या वर्षी २० लाख टनांची निर्यात झाली होती. यंदा शिल्लक सोयापेंड कमी असल्याने निर्यात घटणार आहे, असेही सोपानेही म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.